TMC-BJP War Dainik Gomantak
गोवा

Goa Elections: ..त्यामुळे भाजपवर कारवाई झालीच पाहिजे; टीएमसीची मागणी

भाजपने (BJP) केलेल्या प्रचारामुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचा आरोप तृणमूल (TMC) कॉंग्रेसने केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Elections: यावर्षी देशात एकूण 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. गोव्यात होणाऱ्या विधानसभा निडावणुकीसाठी गोव्यातील स्थानिक तसेच राजकीय पक्षांनी देखील जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election 2022) असल्यामुळे सरकार निवडणुकीच्या कयामत व्यस्त आहे पण कोरोनाचा फैलाव मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे राज्यात निर्बंधांमध्ये वाढ झाली आहे.

दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये अती-तटीचा सामना रंगत आहे. निवडणूक अगदी काही दिवसांवर असल्यामुळे राजकीय पक्ष स्वत:च्या पक्षाची ताकद वाढवण्यावर आणि समोरच्या पक्षाची ताकद कमी करण्यावर भर देत आहेत. यादरम्यान आपल्याला परस्पर विरोधी पक्षांमधील आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात तर कधी ट्वीटर युद्ध पाहायला मिळत आहे. समोरच्या पक्षातील त्रुटी काढण्यातही राजकारणी चांगलेच व्यस्त आहेत. परंतु निवडणूक आयोगाने (Election Commission) राजकीय पक्षांच्या प्रचाराला आणि रॅलीवर बंदी घातली आहे. असे असतानादेखील पक्षांतर्फे निवडणूक प्रचारालादेखील झाली आहे. यातच आज गोव्यातील सत्ताधारी पक्ष भाजपने (BJP) केलेल्या प्रचारावर तृणमूल कॉंग्रेसने (TMC) आक्षेप घेतला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भाजप पक्षातर्फे कोरगाव आणि पेडणे येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे (Sadanand Sheth Tanawade) यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरा बैठका आयोजित करण्यात आलेल्या होत्या. निवडणूक आयोगाने निर्बंध लावून सुद्धा भाजपने बैठक घेऊन आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप टीएमसीने केला आहे. आणि यामुळे त्यांनी भाजप पक्षावर कारवाई करण्याची मागणीदेखील निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया नेमकी काय असणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

SCROLL FOR NEXT