Goa राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. Dainik Gomantak
गोवा

Goa Elections: नेत्यांनी घेतली शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांची भेट

या भेटीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींचा लेखाजोखा त्यांनी मांडला.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात तृणमूल कॉंग्रेस भाजपविरोधी आघाडी करण्यासाठी प्रयत्न करीत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही (NCP) हालचाली सुरू केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा व सरचिटणीस संजय बर्डे यांनी काल मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली. पवार यांनी गोव्याच्या (Goa) दौऱ्यावर येऊ असे सांगितले असले तरी निश्चितपणे कधी दौरा करणार हे निश्चित नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश पातळीवरील नेते काही वैयक्तिक कामांनिमित्त मुंबईत होते. त्यांनी कामे आटोपल्यानंतर पवार व पटेल यांची भेट मिळते का, याची चाचपणी केली. भेटीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींचा लेखाजोखा त्यांनी मांडला.

पक्षाने उत्तर गोव्यावर भर देण्याचे ठरवले आहे. त्याशिवाय मगो, फॉरवर्ड व कॉंग्रेसशी सुरू असलेल्या चर्चेविषयी माहिती दिली. 11 वाजता पवार यांची तर पटेल 4 वाजता भेटले. दोघांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे पर्यायी आराखडा तयार असल्याबाबत आश्वस्त केले.

- संजय बर्डे, सरचिटणीस

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट झाली. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्ष पुरेसा गंभीर आहे. त्याची पूर्वतयारी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

- जुझे फिलिप डिसोझा, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT