पणजी येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Chairman in charge Girish Chodankar बोलत होते.  Dainik Gomantak
गोवा

Goa Elections: 'युतीबाबत काही माहिती नाही' फक्त निवडणूकीची तयारी करण्याचे आदेश

पणजी येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Chairman in charge Girish Chodankar बोलत होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: आम्हांला 40 ही मतदारसंघात निवडणूक तयारी करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे युतीबाबत आपणास काही माहिती नाही. कॉंग्रेस पक्षाने एकही उमेदवार अद्याप नक्की केलेला नाही. त्यामुळे जे उमेदवार आपली उमेदवारी पक्की असल्याचे दावे कारत आहेत त्यावर लोकांनी विश्‍वास ठेऊ नये. त्या 10 फुटीर आमदारांना पराभूत करण्यासाठी खास उपाय योजले जातील. असे प्रतिपादन गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Chairman in charge Girish Chodankar यांनी केले. पणजी येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत चोडणकर बोलत होते. यावेळी सेवा दलाचे निमंत्रक शंकर किर्लपाळकर, युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर आदी उपस्थित होते.

गोवा कॉंग्रेसचे निवडणूक मुख्य निरीक्षक पी चिदंबरम व गोवा प्रभारी दिनेश राव हे ता. 18 रोजी गोव्यात येत आहेत. ते 18 रोजी कुंभारजुवा व सांताक्रुझ आणि ता.19 रोजी केपे व वास्को येथे बैठका घेणार आहेत. 40 ही मतदारसंघात पक्षाचे काम सुरु असून गोवा कॉग्रेसची निवडणूक प्रक्रिया अध्याप सुरु झालेली नाही. सक्रिय सदस्यांच्या मदतीने गट समित्या जिल्हा समित्याकडे उमेदवारांची नावे पाठवतील. त्यानंतर जिल्हा समिती प्रदेश निवडणूक समतीला सदर नावे पाठवील. प्रदेश समिती नावांची छाननी करुन केंद्रिय निवडणूक समितीला नावे पाठवील व दिल्लीतून उमेदवारांची नावे घोषीत होणार आहेत. अशी माहिती चोडणकर यांनी दिली व जे उमेदवार दावे करतात त्यांच्यावर मतदारांनी विश्‍वास ठेऊ नये. असेही चोडणकर यावेळी म्हणाले.

त्या 10 फुटीराचा पराभव करणार

कॉंग्रेसमधून भाजपात गेलेल्या 10 फटीर आमदारांचा पराभव करण्यासाठी पक्ष खास उपाय योजत आहे. दुसरीकडे न्यायालयाद्वारे आपण दाखल केलेल्या याचीकेचा अंतीम निकाल आपल्या बाजुनेच लागेल. असा आपणास विश्‍वास आहे. असा दाव चोडणकर यांनी यावेळी केला

पंतप्रधानांनी गोवेकरांची माफी मगावी

गोवेकराना रोजगार देण्यास अपयशी ठरल्याबद्दल, म्हादयी कर्नाटकाला दिल्याबद्दल व कोरोनामुळे 3300 लोकांचे बळी आॅक्सीजन अभावी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवेकरांची माफी मागावी असी मागणी यावेळी चोडणकर यांनी केली. उद्या पंतप्रधान लसीकरणाच्या विषयावर गोव्यातील कोविड योध्याशी थेट संवाद साधणार आहेत. त्यावेळी त्यांनी बंदर विधेयक, नद्यांचे राष्ट्रियीकरण, कोरोना मृत्यू याबद्दल स्पष्टीकरण द्यावे. मुख्यमंत्री वारंवार खोटे बोलताता, त्यांना सत्या बोलण्यास सांगावे. असेही यावेळी चोडणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT