Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Election: 31 जानेवारीपर्यंत रोड शो, रॅलीला परवानगी नाही

निवडणूक आयोगाची नवीन नियमावाली जाहीर

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) जारी केलेल्या नवीन नियमावलीच्या आधारावर
गोव्याचे जिल्हा दंडाधिकारी (DMs) आणि जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर नवीन नियम आणि निर्बंध लागू केले आहेत. (Election Commission New Rules for Election Campaign in Goa)

गोवा निवडणूक (Goa Election) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रॅली आणि रोड शोवरील बंदी 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

नवीन नियम

1. 31 जानेवारी 2022 पर्यंत कोणत्याही रोड शो, पदयात्रा/सायकल/बाईक/वाहन रॅली आणि मिरवणुकीला परवानगी दिली जाणार नाही.

2. 31 जानेवारी 2022 पर्यंत राजकीय उमेदवार (संभाव्यांसह) किंवा निवडणुकीशी संबंधित इतर कोणत्याही गटाच्या प्रत्यक्ष रॅलींना परवानगी दिली जाणार नाही.

3. इनडोअर हॉल/ऑडिटोरियम/कम्युनिटी हॉल/इत्यादीं ठिकाणी सार्वजनिक मेळावे घेताना आसन क्षमतेच्या 50% किंवा 300, यापैकी जे कमी असेल ती आसन क्षमता ग्राह्य धरली जाईल.

4. राजकीय पक्षांना, उमेदवारांना, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, निवडणुकीशी संबंधित प्रचात करताना कोविडचे नियम पाळणे बंधनकारक आहे.

5. रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत प्रचाराला परवानगी नाही.

6. उमेदवारांसह (सुरक्षा कर्मचारी वगळून) जास्तीत जास्त 10 व्यक्तींना घरोघरी प्रचार करण्याची परवानगी असेल.

या नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे देखील आदेशात लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT