Goa Election: Football Player Alvito D'Cunha in Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Election: फुटबॉलपटू आल्वितो डिकुन्हा यांच्या हातात काँग्रेसचा झेंडा

आल्वितो डिकुन्हा (Alvito D'Cunha) यांनी ईस्ट बंगाल संघाकडून अनेक वर्ष फुटबॉल खेळला आहे (Goa Election)

दैनिक गोमन्तक

विधानसभेच्या तोंडावरच (Goa Assembly Election) ख्यातनाम फुटबॉलपटू (Football Player) आल्वितो डिकुन्हा यांनी आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे . आल्वितो डिकुन्हा (Alvito D'Cunha) यांनी ईस्ट बंगाल संघाकडून अनेक वर्ष फुटबॉल खेळला आहे . तर काहि दिवस ते भारतीय फुटबॉल संघाचेही सदस्य होते.(Goa Election: Football Player Alvito D'Cunha in Congress)

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, कार्याध्यक्ष आलेक्स‌ सिक्वेरा, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत,आदींच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे

त्यांच्या प्रवेशामुळे युवा वर्गात चैतन्याचे वातावरण निर्माण होणार असून‌ आणखीनही क्रीडापटू कॉंग्रेसमध्ये येतील अशी अपेक्षा यावेळी विविध कॉंग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

कुडचडेतील माजी नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांनी आल्‍वितो डिकुन्हा यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी महत्त्‍वाची भूमिका बजावली. त्यांनी त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करा, असा आग्रह धरला. आजोबा, वडील काँग्रेसमध्ये असल्याने फक्‍त घरातच नव्हे, रक्तातच काँग्रेसचा विचार आहे, असे सांगणाऱ्या आल्‍वितो यांना होकार देणे फारसे कठीण गेले नाही. त्यामुळे होडारकर यांचा काँग्रेसमधील भाव आणखीन वधारला आहे.

दरम्यान मी उमेदवारीच्या आशेने काँग्रेसमध्ये आलेलो नाही. निवडणूक लढवण्याचा विचारसुद्धा केलेला नाही. आमचा गोवा वाचवण्यासाठी काँग्रेस सत्तेवर येणे आवश्यक आहे. त्‍यामुळे भाजपच्या पराभवासाठी वावरण्याचे मी ठरवले आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीवेळी भाजपनेही मला ऑफर दिली होती, ती मी नाकारली होती. असे स्पष्टीकरण आल्‍वितो डिकुन्हा याने दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT