Goa Election: फडणवीसांचा 20 तारखेला गोवा दौरा Dainik Gomantak
गोवा

Goa Elections: देवेंद्र फडणवीसांचा 20 तारखेला गोवा दौरा

गोवा निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीस पहिल्यांदाच गोव्यात येत आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते आणि गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस 20 सप्टेंबरला गोवा (Goa) दौऱ्यावर येत आहेत. गोवा निवडणूक प्रभारी म्हणून ते पहिल्यांदाच गोव्यात येत आहेत. या दौऱ्यात ते मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने केलेली तयारी आणि आगामी उपक्रम आणि कार्यक्रम यांची ते माहिती घेणार आहेत.

महाराष्ट्र आणि गोव्याची संस्कृती, कला, क्रीडा, सामाजिक आणि भौगोलिक सलगता तसेच बोलीभाषा याचा विचार करता फडणवीस यांची ही निवड आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला फायदेशीर ठरेल, असे तज्ञांचे मत आहे. गोवा भाजपसाठी फडणवीस यांच्यासारख्या प्रभावी वक्तृत्व, नेतृत्व, अभ्यासू आणि व्यासंगी नेत्याची प्रभारीपदी निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे यांनी यापूर्वीच स्वागत केले आहे. श्री. फडणवीस गोवा दौऱ्यावर येत असल्याने गोवा भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री. फडणवीस आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी लोकांवर मोहिनी घालणारे गोमंतकीयावर ही आपला प्रभाव पडतील, असा विश्वास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला. गेम चेंजर अशी प्रतिमा असलेले श्री फडणवीस यांनी बिहार सह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट काम केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT