Goa Election: AAM Admi Party start door to door campaign Dainik Gomantak
गोवा

Goa Election: गोव्यात ‘आप’ चा घरोघरी प्रचार

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘आप’ने घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे.

दैनिक गोमन्तक

म्हांबरे आणि नेते प्रशांत नाईक यांनी सांत आंद्रे आणि कुंकळ्‍ळी मतदारसंघात घरोघरी आपचा प्रचार सुरू केला आहे . आम आदमी पार्टीने (AAP) रोजगार हमी जाहीर केली तेव्हा सरकारला (Goa Government)जाग आली आणि निवडणुकीपूर्वी (Goa Election) दहा हजार नोकऱ्यांचे गाजर दाखवले. गेल्या पाच वर्षांत त्या नोकऱ्या कुठे होत्या?, आता फक्त एक महिना बाकी आहे, किती नोकऱ्या देणार? असा सवाल आपने केला आहे. (Goa Election: AAM Admi Party start door to door campaign)

कुंकळ्‍ळीवासीयांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना पाहिले आणि निवडूनही दिले. पण तरीही विकास झालेला नाही. चांदर आणि गिर्दोली येथे प्राथमिक आरोग्यकेंद्र नाही. ‘आप’ सत्तेत आल्यास 50 खाटांचे अर्बन हेल्थ सेंटर उभारेन, असे आश्‍‍वासन प्रशांत नाईक यांनी दिले. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची नितांत गरज आहे हे आता गोमंतकीयांना कळून चुकले आहे आणि ते फक्त आम आदमी पार्टीच देऊ शकते असेही ते म्हणाले.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘आप’ने घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे. मोफत वीज आणि मोफत तीर्थयात्रेच्या हमींवर पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असा दावाही यावेळी करण्‍यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT