Mahadev Khandekar while submitting his nomination form  Dainik Gomantak
गोवा

Goa Election: डिचोलीतील तिन्ही मतदारसंघात मिळून 25 उमेदवारी अर्ज दाखल

साखळीत सर्वाधिक 11 उमेदवार

दैनिक गोमन्तक

डिचोली: उमेदवारी अर्ज भरण्याच्या काल (शुक्रवारी) शेवटच्या दिवशी साखळीत आठ तर मयेत 2 मिळून दहाजणांनी अर्ज भरले आहेत, तर डिचोली तालुक्यातील तिन्ही मतदारसंघात मिळून एकूण 25 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी साखळी मतदारसंघातून महादेव खांडेकर यांनी मगो पक्षातर्फे तर मनोजकुमार घाडी यांनी 'आप'तर्फे (AAP) अर्ज भरला. (Bicholim Goa Assembly Election 2022)

ऍड. सागर धारगळकर (शिवसेना), सुजय गावस ('आरजी') आणि लवू पेटकर, सुनील फुलारी, नवनाथ मुळवी आणि दाऊदखान पठाण (अपक्ष) यांनीही शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरले आहेत. साखळी मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांच्याकडे या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापूर्वी या मतदारसंघातून मुख्यमंत्री डॉ. सावंत (भाजप) आणि धर्मेश सगलानी (काँग्रेस) आणि महेश परब यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. मये मतदारसंघातून शुक्रवारी दिपकुमार मापारी आणि शिला घाटवळ (अपक्ष) यांनी अर्ज भरले.

तालुक्यातून 25 जणांचे अर्ज

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत साखळी आणि मयेत प्रत्येकी आठ आणि डिचोलीत (Bicholim) पाच मिळून डिचोली तालुक्यातील तिन्ही मतदारसंघातून एकूण एकवीस जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

मये (Mayem) मतदारसंघातून प्रेमेंद्र शेट (भाजप), प्रवीण झांट्ये (मगो), संतोषकुमार सावंत (गोवा फॉरवर्ड), प्रा. राजेश कळंगुटकर (आप), श्रीकृष्ण परब (आरजी), मिलिंद पिळगावकर, रोहन सावईकर, शिला घाटवळ आणि दीपकुमार मापारी (अपक्ष) या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. डिचोली मतदारसंघातून राजेश पाटणेकर (भाजप), नरेश सावळ (मगो), मेघ:श्याम राऊत (काँग्रेस), अनिश नाईक (आरजी) आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये (अपक्ष) या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT