Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: शाळेची घंटा वाजणार 6 जूनपासून, महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष 19 पासून होणार प्रारंभ, शालेय साहित्य दरात 15 टक्क्यांनी वाढ

goa schools reopening date june 6: राज्यात सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असून नवीन शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे नवीन शैक्षणिक वर्ष ६ जूनपासून सुरू होणार आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असून नवीन शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे नवीन शैक्षणिक वर्ष ६ जूनपासून सुरू होणार आहे.

शाळा सुरू होण्यासाठी आता अवघेच दिवस राहिल्याने सुट्टीसाठी परगावी, परराज्यात गेलेले पालक आणि विद्यार्थी आता पुन्हा घरी परतू लागले आहेत.

महाविद्यालयीन आणि गोवा विद्यापीठाचे नवीन शैक्षणिक वर्ष हे १९ जूनपासून सुरू होणार आहे. शाळांचे पहिले सत्र हे १ एप्रिल ते १० ऑक्टोबर तर महाविद्यालयाचे १९ जून ते १४ ऑक्टोबर असणार आहे.

शालेय साहित्य दरात १५ टक्क्यांनी वाढ

शाळा सुरू होण्याची तारीख जवळ आल्याने राज्यातील बाजारपेठांमध्ये शालेय साहित्य दाखल झाले आहे. गणवेश, दप्तर (बॅग), वह्या, पुस्तके, रेनकोट आणि छत्री खरेदी करण्यासाठी पालक मुलांसह दुकानांमध्ये जाताना दिसत आहेत. वाढत्या महागाईमुळे यंदा शालेय साहित्याच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

ED Raid: 155 कोटींचा बँक घोटाळा अन् 'ईडी'चा थेट गोव्यात छापा! 'या' बड्या कंपनीवरील कारवाईने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT