School Dainik Gomantak
गोवा

केंद्राकडून इयत्ता पहिलीच्या प्रवेशाची वयोमर्यादा निश्चित; गोव्यात मात्र 2026-27 पासून 'तो' नियम लागू होणार

Goa Education Department: गोवा दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी भविष्‍यात गोवा शैक्षणिक व पर्यटन हब म्‍हणून ओळखला जाईल, असा विश्वास व्‍यक्‍त केला होता.

Ganeshprasad Gogate

Goa Education Department: येत्या शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून केवळ 6 वर्षे वय पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्याची सूचना केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

असे असले तरी गोव्यात मात्र 2026-27 पासून त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितल्याचे समोर येतेय.

सध्या गोव्यातील शाळांमध्ये नवे शैक्षणिक धोरण राबवण्यासंदर्भात सध्या चर्चा, विनिमय सुरु आहेत.

तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात केलेली तरतूद पुरेशी आहे का?, कोणत्या आधारे ती तरतूद करण्यात आली आहे? याची चिकित्सा करण्यात आली आहे.

ते धोरण चांगले आहे, पण ते टप्प्याटप्याने लागू केले पाहिजे,असे मत आमदार दिगंबर कामत यांनी मागील विधानसभा अधिवेशनाच्या कालखंडात मांडले होते.

गोवा दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी भविष्‍यात गोवा शैक्षणिक व पर्यटन हब म्‍हणून ओळखला जाईल, असा विश्वास व्‍यक्‍त केला होता.

तर गोव्याची राजभाष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणी भाषेच्या जपणुकीसाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कोकणी शिकण्यास प्रवृत्त करावे अशी मागणी केली होती.

सोबतच गोवा सरकार पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये संस्कृत शिकवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माहिती दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Shami: ‘मी क्रिकेट सोडून देईन!’… मोहम्मद शमी जेव्हा निवृत्ती घेणार होता, भरत अरुण यांचा मोठा खुलासा

Shaktipeeth Expressway: कोल्हापूरला वगळलं; शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनासाठी सरकारकडून आदेश जारी

Monthly Numerology Prediction September 2025: सप्टेंबर महिन्यात मूलांक 1 ते 7 पर्यंतच्या लोकांचे नशीब उजळणार, मोठा धनलाभ होणार; मान-सन्मान वाढणार!

गोव्याच्या गणेशोत्सवात रमली अभिनेत्री समीरा रेड्डी; फोटो शेअर करत म्हणाली, 'ही नवी सुरुवात...'

Viral Video: अटारी बॉर्डरवर पाकड्यांची 'पोलखोल'! पाकिस्तानच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य, तर भारताची बाजू स्वच्छ; पावसाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT