Goa School Board Decision Dainik Gomantak
गोवा

Goa Education: विद्यार्थ्यांचा ताण होणार कमी! गोव्यात नववीचे पेपर आता शाळाच काढणार; बोर्डाचा जुना निर्णय मागे

Class 9 Exam Goa: बोर्डाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली असून, यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे

Akshata Chhatre

पणजी: गेल्या काही काळापासून नववीचे पेपर बोर्डाकडून काढले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली भीती आणि तणाव लक्षात घेऊन गोवा बोर्डाने मोठा बदल केलाय. २०२५-२६ च्या वार्षिक परीक्षेपासून नववीचे प्रश्नपत्रिका तयार करण्याचे स्वातंत्र्य शाळांना पुन्हा देण्यात आले आहे. बोर्डाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली असून, यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

निर्णयामागची प्रमुख कारणे

१. विद्यार्थ्यांवरील ताण: बोर्डाने पेपर काढण्यास सुरुवात केल्यापासून विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली होते. बोर्डाच्या पेपरच्या भीतीने अनेक विद्यार्थी महागड्या कोचिंग क्लासेसकडे वळले होते. स्वतःचे शिक्षक पेपर काढणार असल्यामुळे आता विद्यार्थ्यांवरील हे ओझे कमी होईल.

२. शिक्षकांचे प्रशिक्षण: यापूर्वी केवळ काही मोजक्याच शिक्षकांना बोर्डाचे पेपर काढण्याची संधी मिळत होती. आता शाळांना अधिकार मिळाल्यामुळे सर्व शिक्षकांना प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कौशल्य आत्मसात करता येईल.

कसा असेल नवा नियम?

  • मार्गदर्शक तत्वे: शाळांना पेपर काढण्याचे स्वातंत्र्य दिले असले, तरी त्यांना बोर्डाने दिलेल्या 'ब्लूप्रिंट'नुसारच प्रश्नपत्रिका तयार करावी लागेल.

  • क्लस्टर तपासणी: तालुका स्तरावर ८ 'क्लस्टर' (गट) तयार करण्यात आले आहेत. शाळांनी तयार केलेले पेपर या क्लस्टरमधील अनुभवी शिक्षकांकडून तपासले जातील. जर एखाद्या शाळेचा पेपर निकृष्ट दर्जाचा आढळला, तर संबंधित शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल.

  • मार्क्स आणि पोर्टल: उत्तरपत्रिकांची तपासणी शाळांचे शिक्षकच करतील आणि मिळालेले गुण बोर्डाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केले जातील.

बोर्डाची 'करडी नजर' कायम जरी शाळा पेपर काढणार असल्या, तरी परीक्षेचे वेळापत्रक मात्र गोवा बोर्डच देणार आहे. परीक्षेच्या काळात बोर्डाची भरारी पथके शाळांना भेटी देऊन नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खात्री करतील. तसेच, शाळांनी काढलेले उत्कृष्ट दर्जाचे पेपर बोर्डाच्या 'क्वेश्चन बँक'मध्ये समाविष्ट केले जातील, ज्याचा उपयोग भविष्यात इतर शाळांना सरावासाठी करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cigarette Price Hike: सिगारेट ओढणाऱ्यांसाठी चटका देणारी बातमी! 4 पटीने वाढणार किंमत; धूम्रपान करणाऱ्यांना सरकारचा मोठा धक्का

Rohit Sharma Viral Photo: 'मी रोहित शर्मासारखा दिसतोय हे ऐकून.. ', हिटमॅनसारख्या दिसणाऱ्या खेळाडूने जिंकले फॅन्सचे हृदय; पहा Video

Goa Dhirio: कोलवामध्ये पुन्हा 'धिरिओ'चा थरार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्राणीमित्रांकडून कारवाईची मागणी

पर्यावरण मूल्यांपासून आपण दूर जातोय का? गोव्यातील निसर्गस्नेही जत्रांचे बदलणारे स्वरुप आणि सावधगिरी

Viral Post: "चार्म गेला, सर्वात वाईट परिस्थिती"! गोवा पर्यटनाबद्दल रंगली चर्चा; सोशल मीडियावर दिली कारणांची लिस्ट

SCROLL FOR NEXT