बढती देण्याच्या प्रक्रियेत प्रंचड घोळ असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत गावकर यांनी केला आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa: कदंब महामंडळाच्या अंधाधुंद काराभारमुळे ज्येष्ठ वाहक बढतीला मुकले

या बढती देण्याच्या प्रक्रियेत प्रंचड घोळ झालेला असून कदंब कर्मचारी संघटनेचा एकही सदस्य संचालक मंडळावर नसल्याचा गैरफायदा संचालक मंडळ घेत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कदंब महामंडळाच्या (Kadamba mahamaṇḍaḷa) संचालक मंडळ व व्यवस्थापनाच्या अंधाधुंद काराभारमुळे (management) अनेक ज्येष्ठ वाहकांना (Senior Carrier) बढतीला (Promotion) मुकावे लागले आहे. व्यवस्थापनांने कदंबच्या किमान ५० वाहकांना त्यांच्या ज्येष्ठतेनुसार तिकीट तपासणीस अर्थात टीसी पदी बढती द्यावी. अशी जोरदार मागणी कदंब महामंडळ कर्मचारी संघटनेने केली आहे. या बढती देण्याच्या प्रक्रियेत प्रंचड घोळ झालेला असून कदंब कर्मचारी संघटनेचा एकही सदस्य संचालक मंडळावर नसल्याचा गैरफायदा संचालक मंडळ घेत आहे. असा आरोप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत गावकर यांनी केला आहे.

ज्येष्ठ वाहकांना टीसी म्हणून बढती देण्याची प्रक्रिया अनेक वर्षांनंतर सुरु झाली होती. मात्र व्यावस्थापन व संचालक मंडळाने आपल्याच जवळच्या लोकांना या पदावर घुसवण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याने गेली अनेक वर्षे कदंब महामंडळात काम करणाऱ्या पात्र ज्येष्ठ वाहकांवर अन्याय होत आहे. कदंबचे सरव्यवस्थापक संजय घाटे दहा वाहकांना बढती देण्यात आल्याचे सांगत आहेत तर कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार कार्लुस आल्मेदा हे या प्रकणी आपण अनभिज्ञ असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे फक्त दोनच आदेश देण्यात आल्याचे ज्येष्ठ वाहक सांगत आहेत. या प्रकरणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गावकर यांनी व्यवस्थापन व संचालक मंडळावर मनमाणीपणाचा व नियम डावलून काम करत असल्याचा आरोप केला आहे.

गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेली काही वर्षे बढती प्रक्रिया राबवण्यात न आल्याने सध्या या प्रकरणी मोठा घोळ झालेला आहे. वेळोवेळी बढती देण्यात आली असती तर हा घोळ निर्माण झाला नसता. सध्या २३ टीसीच्या जागा भरण्याचे ठरलेले आहे. मात्र संघटनेने किमान ३० भराव्यात अशी मागणी पुर्वीच केली होती. आता संघटनेने ५० जागा भरण्याची मागणी केल्याचे सांगून सध्या संचालक मंडळ व व्यावस्थापन जो मनमाणी कारभार करत आहेत त्याला संघटनेचा तिव्र विरोध असल्याचे गावकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT