Dudhsagar  Dainik Gomantak
गोवा

Monsoon Season In Goa: पर्यटकांसह ट्रेकर्ससाठी गुडन्यूज ! लवकरच पावसाळ्यातही दूधसागरवर ट्रेकिंग करता येणार

प्रस्ताव विचाराधीन : पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आखण्याचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

Monsoon Season In Goa: प्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर आता पावसाळ्यात ट्रेकिंगला जाणे शक्य होणार आहे, तसा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाच्या विचाराधीन आलेला आहे. या धबधब्याकडे जाणारा रस्ता अभयारण्यातून जातो.

या रस्त्यावर दोन ठिकाणी नदी ओलांडावी लागते. पावसाळ्यात मोले ते दूधसागर ही जीप वाहतूक बंद ठेवली जाते. त्यामुळे पावसाळ्यात दूध सागरचे दर्शन दुर्लभ होते. केवळ रेल्वे प्रवासाद्वारे हेच दूध सागर असे दर्शन घेता येते.

या ठिकाणी पावसाळ्यात जाण्यास बंदी असतानाही रेल्वे रुळावरून अनेक जण चालत जात असत. त्यांना अलीकडेच पकडून रेल्वे सुरक्षा दल कर्मचाऱ्यांनी ताकीद दिली. त्यांनी या पर्यटकरूपी भ्रमंतीकारांना उठाबशाही काढायला लावल्या होत्या.

ही बातमी देशभर व्हायरल झाल्यामुळे सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्याची दखल घेत सनदशीर मार्गाने मोले ते दूधसागर हा गिर्यारोहणाचा मार्ग कसा खुला करता येईल, याचा विचार सरकारने सुरू केला आहे.

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर यांनीही या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे लवकरच दूधसागर वर ट्रेकिंग करणे शक्य होईल, असे दिसते.

ग्रामपंचायतींना संधी

पावसाळ्यातही जर दूधसागरवर ट्रॅकिंगची सुविधा उपलब्ध झाली तर देशभरातून या धबधब्यावर येण्यासाठी आतुरलेल्या पर्यटकांसह स्थानिक पंचायतींनाही महसूल प्राप्तीचा मार्ग उपलब्ध होणार आहे. काही दिवसांपूर्वी मैनापी धबधब्यावरील दुर्घटनेत दोघांचा बळी गेल्यानंतर सरकारने दूधसागर धबधब्यावर रेल्वेमार्गे जाण्यास बंदी घातली होती.

त्यामुळे स्थानिक पंचायत मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता पावसाळ्यातही दूधसागर धबधब्यावर ट्रॅकिंगची सुविधा उपलब्ध झाली तर पंचायतींच्या महसुलात भर पडणार आहे. तथापि, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची आवश्‍यकता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT