Drunk and Drive Case
Drunk and Drive Case Dainik Gomantak
गोवा

Drunk and Drive Case: लग्नघर आणि नाईट क्लबबाहेर अल्कोमीटरसह वाहतूक पोलिस तैनात करण्याची गरज- आलेक्स सिक्वेरा

Ganeshprasad Gogate

Drunk and Drive Case: राज्यात सध्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेसमध्ये वाढ होत असून पोलीस प्रशासन वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कडक कारवाई करत असल्याचे दिसतंय.

मात्र असे असूनही वाहनचालकांकडून वेळोवेळी नियमांची पायमल्ली होत असून अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

त्यामुळेच आता रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी लग्नघरांच्या आणि नाईट क्लबच्या बाहेर अल्कोमीटरसह वाहतूक पोलिस तैनात करण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण तसेच कायदा व न्यायमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी बोलून दाखवले आहे.

मेट्रो शहरांमध्ये अशी प्रणाली अस्तित्वात असून गोव्यातही त्याच बाबतीत नियम राबवण्याची गरज असल्याचे सिक्वेरा म्हणाले.

लग्न घर आणि नाईटक्लबच्या बाहेर अल्को मीटर घेऊन ट्रॅफिक पोलिसांनी चेकिंग करण्याची गरज असून त्यामुळे काही प्रमाणात अपघातांना आला बसेल असेही ते म्हणाले.

दरम्यान बुधवारी पणजीत ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून आले.

आगामी नाताळ व नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी रात्रीच्यावेळी वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वीच नियम मोडणाऱ्या 35 चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आलीय.

मद्यधुंद वाहन चालकांसह सीट बेल्ट व हेल्मेट न घालणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. ही मोहीम नववर्षापर्यंत सुरूच राहणार आहे अशी माहिती पर्वरीचे पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिलीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT