गोवा

Goa Drunk and Drive: नशा, भरधाव वेग आणि अपघात; तळीरामांना थोपवण्याचे पोलिसांपुढे आव्हान, बाणस्तारी नंतर आसगावात दुसरी घटना

या अपघातात हुंडाई गाडीतील सुरज शर्मा (डेहराडून) व अंकिता पाल (दिल्ली) हे दोघे गंभीर जखमी झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drunk and Drive Accident: बाणस्तारी येथे घडलेले ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’चे प्रकरण ताजे असतानाच काल मध्यरात्री आसगाव येथे एका मद्यधुंद पर्यटक कारचालकाने आपल्या ‘हुंडाई आय-२०’ या ‘रेंट अ कार’ने दुसऱ्या एका कारला जोरदार धडक दिली.

या अपघातात हुंडाई गाडीतील सुरज शर्मा (डेहराडून) व अंकिता पाल (दिल्ली) हे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले.

म्हापशाहून आसगावमार्गे शिवोलीकडे येणाऱ्या ‘रेंट अ कार’ने (क्र. जीए - ०३ - डब्ल्यू - ७०३३) आसगाव येथे पोचताच तेथे रस्त्याकडेला उभ्या करून ठेवलेल्या अर्चना नाईक यांच्या वॅगनर कारला (क्र. जीए - ०३ - आर - ११७४) जोरदार धडक दिली.

कारमध्ये बिअरच्या बाटल्या!

पर्यटकांच्या अपघातग्रस्त कारमध्ये दर्शनी आसनावर बिअरच्या बाटल्या पडल्या होत्या. हे पर्यटक दारू प्राशन करीत वाहन चालवत होते आणि याच मद्यधुंद स्थितीत त्यांचे कारवरील नियंत्रण गेले आणि हा अपघात घडल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. हणजूण पोलिसांनी कारचालक पर्यटकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

मद्यधुंद पर्यटक गंभीर जखमी

या अपघातात सुरज शर्मा व अंकिता पाल हे पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. हणजुण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या जखमी पर्यटकांना प्रथम म्हापसा व नंतर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT