Drugs Case
Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: राज्यात अमली पदार्थ विक्रेत्यांचा सुळसुळाट; दिवसभरातल्या दोन घटनांत अंदाजे 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

Ganeshprasad Gogate

Goa Drugs Case: राज्यात वाढते अपघात, चोऱ्या थांबणे या सोबतच अमली पदार्थांची विक्री थांबवणे हे मोठं आवाहन सध्या पोलिसांसमोर उभं राहिलंय.

गोव्यात अमली पदार्थ विक्री, हाताळणीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याचे प्रमाण विशेषतः किनारी भागात वाढत आहे.

शुक्रवारी राज्यात अशा प्रकरणाच्या दोन घटना घडल्या असून या दोन्ही घटनांमधून अंदाजे 5 लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला गेलाय.

थिवी रेल्वे स्टेशनजवळ अंमली पदार्थांवर धाड टाकून दोन पुरुषांना पोलिसांनी रंगेहात पकडले. प्रभुदत्त त्रिपाठी (वय 28, ओडिशा) आणि श्याम सुंदर सिंग (वय 23,ओडिशा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून 5.10 किलोग्रॅम वजनाचा सुमारे 5 लाखांचा गांजा जप्त करण्यात आलाय.

तर दुसरी घटना कळंगुट या किनारी भागात घडली असून पालमरिन्हा रिसॉर्ट, कळंगुट येथे पोलीसांनी ग्राहकांना अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या अश्रू भीमा काळे (वय 28, उस्मानाबाद महाराष्ट्र) याला ताब्यात घेत त्याच्याकडून 960 ग्रॅम वजनाचा 96,000 हजार किमतीचा अंमली पदार्थ जप्त केलाय.

या दोन्ही घटनांमध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींवर NDPS Act 1985 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; सक्तीच्या नसबंदीला बळी पडलेल्यांना मिळणार नुकसान भरपाई; सरकारला आदेश

SCROLL FOR NEXT