Svetlana Varganova International Drug Cartel Busted in Goa 
गोवा

गोव्यात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा भांडाफोड; रशियन ऑलिम्पिक विजेती अटकेत

नॅशनल नार्कोटिक कंट्रोल ब्यूरोने मांद्रेमध्ये टाकलेल्या छाप्यात 30 लाखांचे ड्रग्ज जप्त

दैनिक गोमन्तक

International Drug Cartel Busted in Goa

अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (NCB)  गोव्यात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा भांडाफोड केलाय.  या टोळीत ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या रशियन महिला खेळाडूचाही सहभाग असल्याचे समोर आले असून एनसीबीने तिला अटक केलीये.  एनसीबीच्या पथकाने तब्बल दोन आठवडे या टोळीविरोधात मोहीम राबवत या टोळीला दणका दिलाय.

(Russia Svetlana Varganova Olympics Swimming Medallist Arrested)

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार मांद्रेमध्ये टाकलेल्या छाप्यात 30 लाखांचे ड्रग्ज जप्त केले असून तिघांना अटक केली आहे. यामध्ये रशियातील ऑलिम्पिक पदक विजेती स्वेतलाना, रशियातील निवृत्त पोलीस अधिकारी आंद्रे आणि आणि गोव्यातील आकाश नामक तरुणाचा समावेश आहे. दरम्यान, पोलीस पुढील तपास करत असून यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले.

दोन आठवडे सुरू होती कारवाई

एनसीबीच्या पथकाने तब्बल दोन आठवडे गोव्यात ड्रग्ज तस्करीविरोधात मोहीम राबवली. हरमल आणि त्याच्या लगतच्या किनारी भागात रशियन टोळी ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. रशियाची स्वेतलाना ही गोव्यात ड्रग्ज पुरवते आणि यात तिला स्थानिक तरुण मदत करतो, अशी माहिती खबरींनी एनसीबीला दिली होती.

तपास पुढे सरकला अन् टोळीचा भांडाफोड झाला

स्वेतलानासोबत याप्रकरणात सहभागी असलेला गोव्यातील आकाश हा तरुण आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य असल्याचे एनसीबीच्या तपासात उघड झाले. आकाश हा या टोळीच्या म्होरक्याच्या आदेशानुसार कायम करायचा. टोळीचा म्होरक्या हा रशियन असून तो निवृत्त पोलीस कर्मचारी असल्याची माहिती पथकाला मिळाली.

१४ एप्रिलला स्वेतलानाला अटक

१४ एप्रिलला एनसीबीच्या पथकाने स्वेतलाना अटक केली. यानंतर २८ एप्रिलला आकाश हा देखील पथकाच्या जाळ्यात अडकला. त्याच दिवशी पथकाने आंद्रे याला देखील अटक केली.

आरोपींकडून काय जप्त करण्यात आले?

88 LSD ब्लॉट्स, 8.8 ग्रॅम कोकेन, 242.5 ग्रॅम चरस, 1.440 किलो हायड्रोपोनिक विड, 16.49 ग्रॅम हॅश ऑइल, 410 ग्रॅम हॅश केक यासह विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले असून, तब्बल 4.88 लाख रुपयांचा मुद्देमालही ताब्यात घेतला आहे. त्याशिवाय NCB ने भारतीय आणि विदेशी चलने, बनावट कागदपत्रे, ओळखपत्र आणि इतर अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT