Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: हडफडे येथे अमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा; नायजेरियन नागरिकाकडून 75 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Drugs Case: 2013 मध्ये त्याला पर्वरी महामार्ग अडवल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.

Ganeshprasad Gogate

Goa Drugs Case:  हडफडे येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून गुन्हेगारीची पार्शवभूमी असलेल्या नायजेरियाच्या ओकेझूयुनू आनेमेम (56वर्षे) याला अटक केली.

त्याच्याकडून कोकेन, एक्स्टसी पावडर व चरस मिळून सुमारे 75 लाखांचा ड्रग्ज जप्त केला. 2013 मध्ये त्याला पर्वरी महामार्ग अडवल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.

दोन दिवसांपूर्वीच म्हणजे शुक्रवारी राज्यात अशाच प्रकारच्या दोन घटना घडल्या असून या दोन्ही घटनांमधून अंदाजे 5 लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता.

थिवी रेल्वे स्टेशनजवळ टाकलेल्या धाडीत दोघा युवकांकडून 5.10 किलोग्रॅम वजनाचा सुमारे 5 लाखांचा गांजा जप्त केला होता.

तर कळंगुट किनारी भागातील पालमरिन्हा रिसॉर्टनजीक टाकलेल्या धाडीत 960 ग्रॅम वजनाचा 96,000 हजार किमतीचा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला होता.

राज्यात वाढते अपघात, चोऱ्या थांबणे या सोबतच अमली पदार्थांची विक्री थांबवणे हे मोठं आवाहन सध्या पोलिसांसमोर उभं राहिलंय.

गोव्यात अमली पदार्थ विक्री, हाताळणीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याचे प्रमाण विशेषतः किनारी भागात वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT