Goa Drugs Case: किनारी भागात पर्यटकांचे भेटी देण्याचे प्रमाण जास्त असून याच भागात गुन्हेगारीच्या घटनाही सातत्याने घडत असलेल्या निदर्शनाला येत आहेत.
दोन दिवसांपूर्वी दक्षिण गोव्यातील काणकोण मधून अमली पदार्थांंसंबंधी बातमीसमोर आली असून आज शुक्रवारी 1 मार्चला उत्तर गोव्यातील हरमल येथे अंमलीपदार्थविरोधी पथकाने छापा टाकल्याची माहिती समोर आलीय.
हरमल येथे अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात केरळच्या महम्मद बसी मेचेरी ( वय 26 वर्षे) व मुर्शिद मुस्तफा कुलांगरा (वय 24 वर्षे) याना अटक करण्यात आली आहे.
त्या दोघांकडून 250 उच्च क्षमतेच्या ट्रिपल डीप एलएसडी ब्लॉट्स जप्त केले असल्याची माहिती मिळाली आहे. जप्त केलेल्या पदार्थांची बाजारू किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे आठवड्याभरातील अंमलीपदार्थविरोधी पथकाची ही दुसरी कारवाई आहे.
दोन दिवसांपूर्वी काणकोणमध्ये मोहनबाग, पाळोळे येथे पावणे दोन लाखांच्या अमली पदार्थासह एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली होती.
ली बोअर (रा. पागीवाडा, काणकोण, मूळ - युके) याच्याकडून 1,74,840 किमतीचे 29.14 ग्रॅम एमडीएमए अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. काणकोण पोलिसांनी धडक कारवाई केली होती त्यात हा प्रकार समोर आला होता.
काही काळापासून गोवा आणि पर्यटन हे समीकरण देशासह परदेशात रूढ झाले असताना आता दुर्दैवाने गोवा आणि गुन्हेगारी हे समीकरण बनू लागलं आहे.
रोजगार आणि पर्यटनाच्या माध्यमातून दरवर्षी कित्येकजण गोव्यात स्थलांतरित होत असून मागील काही वर्षांपासून चोरी, अपहरण, मारामारी, खून बलात्कार, अमली पदार्थांचा वापर या आणि अशा अनेक घटना पर्यटनाने समृद्ध असणाऱ्या गोव्यात घडत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.