येणाऱ्या निवडणुकीत 40 जागा देखील लढण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa: युतीसाठी दारे उघडी, नाही झाल्यास आम्ही 40 मतदारसंघात लढण्यास तयार - चिदंबरम

मी इथे प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी आलेलो नसून, येणाऱ्या निवडणुकीत 40 जागा देखील लढण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे. तरीसुद्धा इतर पक्षांच्या नेत्यांशी भेटून युतीबाबत चर्चा करण्यास आपण तयार आहोत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील (Goa) सर्व मतदारसंघांमध्ये (Constituency) काँग्रेसचे (Congress) कार्य वाढलेले असून, येणाऱ्या निवडणुकीत 40 जागा देखील लढण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे. तरीसुद्धा इतर पक्षांच्या नेत्यांशी भेटून युतीबाबत चर्चा करण्यास आपण तयार आहोत. अशी माहिती निवडणूक निरीक्षक व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच मी इथे प्रदेश अध्यक्ष बदलण्यासाठी आलेलो नसून, निवडणूक निरीक्षक म्हणून आलेलो आहे. असे त्यांनी नमूद केले. गोवा दौर्‍यावर असलेले चिदंबरम यांनी आज दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिनेश गुंडुराव व स्थानिक नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी वरील निवेदन केले. कुठल्याही इतर नेत्यांना पक्षात घेताना, उमेदवारी देताना स्थानिक सक्रिय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात येईल. त्या 10 फुटीर आमदारांना पक्षात घेण्यासाठी स्थानिक नेत्यांशी चर्चा केली जाईल. असेही त्यांनी सांगितले

विद्यमान सरकार चे काम वाईट असल्यामुळे आणि त्यांच्यावर लोकांचा विश्वास नसल्यामुळेच या पक्षाला अनेक दिवसापूर्वी प्रचार करावा लागतोय. असे सांगून काँग्रेसचे उमेदवार ठरवताना त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी शक्यतो लवकर उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्याने सांगितले. प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी इथं आलेलो नाही असे सांगून गिरीश चोडणकर यांना चिदंबरम यांनी एक प्रकारे अभयच दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT