Sadanand Shet Tanawade Dainik Gomantak
गोवा

गोव्याला दिल्ली मॉडेलची गरज नाही: सदानंद शेट तानावडे

उलट गोव्यातील सामाजीक विकासाच्या योजनांचे मॉडेल दिल्ली सरकारने (Delhi Government) राबवावे.

दैनिक गोमन्तक

गोव्याला (Goa) दिल्ली मॉडेलची (Delhi Model) गरज नाही. उलट गोव्यातील सामाजीक विकासाच्या योजनांचे मॉडेल दिल्ली सरकारने राबवावे. तेथील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व विधवा यांच्यासाठी दयानंद सामजिक सुरक्षा योजना, कलाकारासाठी कलासन्मान योजना, गृहिनीसाठी गृह आधार योजना व मुलीसाठी लाडली लक्ष्मी योजना सुरु कराव्यात. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी केले आहे.

एका वत्तवाहिनीशी बोलताना तानावडे म्‍हणाले की गोव्यात ज्या ज्या वेळी भाजपचे सरकार आले त्या त्या वेळी समाजातील विविध घटकांच्या विकासाच्या योजनां सुरु करण्यात आल्या. वरील सामाजीक योजना माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरु केल्या. तसेच अनेक विकास प्रकल्पही भाजपच्या सरकारने पुर्वी उभे केले व आत्ताही उभे करत आहे. त्यामुळे दिल्ली मॉडेलची गोव्याला गरज नाही. विविध योजनांच्या माध्यमातून घरोघरी सरकारी मदत पोचते. असे सांगून भाजप म्हणजे जनहित व गोव्याचा विकास! हे ठरुन गेल्याचे तानावडे यांनी दिल्ली मॉडेलची गोव्याला गरज आहे का? या प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

आपण किवा आपला पक्ष विरोधकांना कधीच कमी लेखत नाही. विरोधकांनी सरकारच्या चुका अवश्‍य दाखवाव्यात मात्र नसलेल्या चुका सरकारच्या माथी मारु नयेत. सकारात्मक राजकारणाला आम्ही नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे तानावडे एका प्रश्‍नावर बोलताना म्हणाले. भुमीपूत्र विधेयक असो वा इतर कुठलेही विधेयक असो. विरोधकांनी सभात्याग न करता सभागृहात उपस्थित राहून चर्चेच भाग घेणे गरजेचे होते. मात्र विरोधकांनी महत्वाच्या विधेयकावरील चर्चेत भाग न घेता सभात्याग केला. याला सरकार जबाबदार कसे? असा प्रश्‍न तानावडे यांनी भुमीपुत्र विधेयकावर चर्चा न झाल्याच्या प्रश्‍वावर बोलताना उपस्थित केला. तानावडे यांनी इतर विविध विषयावरील प्रश्‍नावरही उत्तरे दिली. भाजप निवडणुकीसाठी नेहमीच सज्ज असतो. सध्या चालू असलेल्या दौऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता. येत्या निवडणुकीनंतर पुन्हा भाजपचेचेच सरकार सत्तेवर असेल असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT