FDC drugs Dainik Gomantak
गोवा

‘एफडीए’कडून अधिसूचना जारी! तात्काळ प्रभावाने 156 ‘एफडीसी’ औषधांवर बंदी

FDC Drugs: भारतातील १५६ फिक्स्ड डोस संयोजन (एफडीसी) औषधांवर मानवी वापरासाठी विक्रीसाठी उत्पादन करणे किंवा वितरण करणे यावर तात्काळ प्रभावाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० च्या कलम कलम २६ अ अंतर्गत अधिसूचना जारी करत भारतातील १५६ फिक्स्ड डोस संयोजन (एफडीसी) औषधांवर मानवी वापरासाठी विक्रीसाठी उत्पादन करणे किंवा वितरण करणे यावर तात्काळ प्रभावाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

तज्ज्ञ समिती आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळ (डीटीएबी) यांच्या समितीच्या अहवालाच्या शिफारशीनुसार ही बंदी घालण्यात आल्याची माहिती एका प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे. या समितीच्या अहवालात या औषधांमुळे रूग्णांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या औषधांवर बंदी घालण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे अशा औषधांवर बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यभरातील औषधांचे किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, उत्पादक, सरकारी इस्पितळे/जिल्हा इस्पितळे/यूएचसी/पीएचसी/आरोग्य सेवा संचालनालयाखालील दवाखाने, गोमेकॉ, गोवा नर्सिंग होम्स, गोवा मेडिकल कौन्सिल/आयएमए तसेच नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी या बंदीची नोंद घ्यावी, असे कळविले आहे. तसेच बंदी घातलेल्या औषधांची यादी www.goa.gov.in वर अपलोड केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश

Blitz Chess Tournament: ब्लिट्झ स्पर्धेत एथन वाझचा डंका! पुन्हा अपराजित कामगिरी

CM Pramod Sawant: युवकांनी FIT INDIA साठी एकत्र यावे; साखळी युवा उत्सव उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Goa Crime: ‘सोनारा’ने घातला 23 लाखांचा गंडा! अनेकांची फसवणूक; पेडणे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Siolim Crime: वाल्लोर!! शिवोलीतील तरुणाने केले दरोडेखोरांशी दोनहात; चाकूचे वार सहन करत हणून पाडला चोरीचा डाव

SCROLL FOR NEXT