Lumpy Virus Dainik Gomantak
गोवा

Lumpy Virus: धावकोणात गुरांना लंपी विषाणूची शक्यता!

Lumpy Virus: एका संशयास्पद गुराचे नमुने घेतले असून, चाचणीसाठी पाठविले आहेत.

दैनिक गोमन्तक

Lumpy Virus: धारबांदोडा पंचायत क्षेत्रात धावकोण येथे गुरांच्या अंगावर बारीक पुरळ आल्याने त्यांना लंपी विषाणूची लागण होण्याची शक्यता असून एका संशयास्पद गुराचे धारबांदोडा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रामा परब यांनी मोले येथील डॉ. केतन यांच्या साहाय्याने नमुने घेऊन चाचणीसाठी पाठवून दिले आहेत.

मिळालेली माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी धावकोण गावातील पाळीव गाय बेशुद्धावस्थेत दूधसागर नदीच्या काठावर पडली होती. त्याची माहिती स्थानिक पंच गुरू गावकर यांनी धारबांदोडा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रामा परब यांना कळविली.

त्यावेळी डॉ. परब यांनी लगेच घटनास्थळी येऊन तपासणी केली व इंजेक्शन दिले. काल मोले येथील डॉ. केतन यांच्या साहाय्याने एका गुराला पकडून त्याचे नमुने चाचणीसाठी पाठवून दिले आहेत.

डॉ. रामा परब, पशुवैद्यकीय अधिकारी-

आम्ही जाऊन संशयास्पद अशा एका गुराचे नमुने घेतले असून चाचणीसाठी पाठविले आहेत. यासंदर्भात स्थानिक पंचायत, आमदारांनाही कळविले आहे.

बालाजी गावस, सरपंच, धारबांदोडा-

गुरांसाठी शेड बांधण्यास पंचायतीकडे निधी नाही. त्यामुळे आम्ही जागा देतो, तेथे शेड बांधून संशयास्पद गुरांना ठेवावे, असे आम्ही पशुवैद्यकीय खात्याच्या डॉक्टरांना कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT