Court On Illegal sand mining In Goa Dainik Gomantak
गोवा

DGP ना मुख्य सचिव गंभीर; गोव्यातील बेकायदेशीर वाळू उत्खननावरुन गोवा सरकार आणि पोलिसांवर कोर्टाचे ताशेरे

मुख्य सचिव आणि डीजीपींना 12 डिसेंबरपर्यंत सविस्तर कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश.

Pramod Yadav

Illegal sand mining In Goa: गोव्यातील बेकायदेशीर वाळू उत्खननावरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकार आणि पोलिसांवर ताशेरे ओढले. बेकायदेशीर वाळू उत्खनन रोखण्यात पोलीस महासंचालक (DGP) ना मुख्य सचिवांना काही स्वारस्य आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

गोवा रिव्हर सँड प्रोटेक्टर्स नेटवर्कने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मत नोंदवले.

“हा केवळ न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांची अवज्ञा करण्याचा प्रश्न नसून, गोव्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करण्याचा प्रश्न आहे. आमच्यासमोर ठेवलेल्या सर्व बाबींचा विचार करता गोवा राज्यातील बेकायदेशीर वाळू उत्खनन रोखण्यात DGP किंवा मुख्य सचिवांना गांभीर्याने स्वारस्य नाही, असा आमचा समज होतो,” असे न्यायालयाने म्हटले आहे.

डीजीपी आणि मुख्य सचिवांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र, कठोर कारवाईची हमी देणारी कागदी आश्वासने राहिली आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

न्यायालयाच्या वारंवार निर्देशांचे पालन न केल्यास पर्यावरण संरक्षणाच्या मुद्द्यावर उच्च अधिकार्‍यांकडून "अधिक संवेदनशीलता" अपेक्षित आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने मुख्य सचिव आणि डीजीपी यांना 12 डिसेंबरपर्यंत सविस्तर कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT