पत्रकार परिषदेत बोलताना गुंतवणूकदार समितीचे निमंत्रक मायरॉन फर्नांडिस. व मान्यवर. Dainik Gomantak
गोवा

‘व्हीजनरीज’च्या अध्यक्षांसह संचालक मंडळाला अटक करा

गुंतवणूकदारांची मागणी; जप्त केलेला पासपोर्ट (Passport seized) सोडवण्यास विरोध करणारा न्यायालयात अर्ज

Siddhesh Shirsat

Goa: 50 कोटींची अफरातफर (Chaos of 50Cr) झाल्याचा वहीम असणाऱ्या व्हीजनरीज पतसंस्थेच्या (Visionaries Credit Society) अध्यक्ष ग्रेसी व्हाझ यांच्यासह सर्व संचालक मंडळाला त्वरित अटक (Arrest) करावी आणि गुंतवणूकदारांचे बुडालेले पैसे सरकारने वसूल करून घ्यावेत, अशी मागणी या पतसंस्थेच्या गुंतवणूकदारांनी केली आहे. कारवाई झाली नाही तर स्थानिक आमदारांना येत्या निवडणुकीत पाडण्यासाठी आम्ही काम करू असा इशारा आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

व्हाझ यांचा कोलवा पोलिसांनी जप्त केलेला पासपोर्ट सोडवावा यासाठी व्हाझ यांनी केलेल्या मागणीवर आज न्यायालयात अंतिम युक्तिवाद होता. व्हाझ यांच्यावर आर्थिक गुन्हेगारी शाखेत एफआयआर दाखल झालेला असल्याने त्यांचा पासपोर्ट सोडला जाऊ नये यासाठी या गुंतवणूकदारांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली असून या अर्जावर पुढील सुनावणीत युक्तिवाद होणार आहे.

कोलवा, माजोर्डा, लोटली व रामनगरी या चार ठिकाणी गुंतवणूक केलेले सुमारे ४ हजार गुंतवणूकदार सध्या अडचणीत आहेत. या प्रकरणी पोलिसही संथगतीने तपास करत आहेत. येत्या २० दिवसांत या तपासात गती आणण्यास जर स्थानिक आमदार फिलिप नेरी रोड्रिंक्स, चर्चिल आलेमाव, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि बाबाशान डीसा यांनी प्रयत्न केले नाहीत तर येनाऱ्या निवडणुकीत फसलेले सर्व गुंतवणूकदार या चारही आमदारांच्या विरोधात काम करतील, असा इशारा यावेळी गुंतवणूकदारांच्या समितीचे निमंत्रक मायरॉन फर्नांडिस यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT