separate toilets for girls Dainik Gomantak
गोवा

मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे पुरविण्यात गोवा अव्वल; सर्वांत पिछाडीवर मेघालय

Goa News: देशातील शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याला १२ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. असे असताना केवळ गोवा, दिल्ली, चंदीगड आणि पुद्दुचेरी ही राज्ये या आदेशाचे पूर्णपणे पालन करताना दिसत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa tops in providing separate toilets for girls

पणजी: देशातील शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याला १२ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. असे असताना केवळ गोवा, दिल्ली, चंदीगड आणि पुद्दुचेरी ही राज्ये या आदेशाचे पूर्णपणे पालन करताना दिसत आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या राष्ट्रीय सरासरी (९८ टक्के) शाळांपेक्षा पूर्वोत्तर राज्ये आणि जम्मू आणि काश्मीर मागे आहे.

या यादीत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शाळांची स्थितीही बरी असल्याचे सांगण्यात आले. २०११ साली आणि त्यानंतर २०१२ ते २०१४ मध्ये वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

शाळांमधील अशा सुविधा मुलींना शाळेत जाण्यास प्रोत्साहित करतात, असे न्यायालयाने म्हटले होते. यानंतर जया ठाकूर यांनी शाळांमध्ये स्वच्छतागृहांची सुविधा आणि विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती, ज्यावर न्यायालयाने अहवाल मागविला होता.

संपूर्ण भारतातील ९७.५ टक्के शाळांनी (सरकारी, सरकारी अनुदानित आणि खासगी) मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती एका प्रतिज्ञापत्राद्वारे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.

मेघालय सर्वांत पिछाडीवर

ईशान्येकडील राज्ये याबाबतीत मागे आहेत. मेघालयात ८१.८ टक्के, मणिपूरमध्ये ८७ टक्के, आसाममध्ये ८८.५ टक्के, त्रिपुरामध्ये ९१.५ टक्के, नागालँडमध्ये ९०.६ टक्के, मिझोराममध्ये ९३ टक्के आणि अरुणाचल प्रदेशात ९१.४ टक्के मुलींसाठी स्वतंत्र शौचालये आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT