Goa Dakshinayan Sanstha send a letter to the president ramnath kovind
Goa Dakshinayan Sanstha send a letter to the president ramnath kovind 
गोवा

गोवा मुक्तिदिनी राष्ट्रपतींनी पंडित नेहरूंच्या योगदानाचा बहुमान करण्याची दक्षिणायनची मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा मुक्तीसाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बजावलेली भूमिका महत्वाची आहे. खरे तर आपण त्यांच्या योगदानाचा आदर करायला हवा. मात्र अनेक मंत्री नेहरूंची खुलेआम खोटी बदनामी करतात. असे न करता नेत्यांनी आपल्या भाषणातून नेहरुंबाबतचा चुकीचा प्रचार थांबवावा. गोवा मुक्तिदिनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या गोवा भेटीवेळी पंडित नेहरू यांच्या योगदानाचा यथायोग्य बहुमान करावा अशी मागणी दक्षिणायन गोवा यांनी केली


तशा आशयाचे पत्रसुद्धा त्यांनी राष्ट्रपतींना लिहिले आहे. दक्षिणायन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत साहित्यिक दामोदर मावजो, सामाजिक कार्यकर्ते दत्ता नायक आणि पत्रकार संदेश प्रभुदेसाई उपस्थित होते. 


गोवा मुक्ती हीरक महोत्सवानिमित्त वर्षभर आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रपती १९ डिसेंबर रोजी गोव्यात येणार आहेत. गोवा सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत करतानाच काही सत्ताधारी गोवा मुक्तीसंदर्भात पंडित नेहरूंना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नेहरूंमुळे गोवा मुक्त होण्यास १४ वर्षे उशीर झाला असा आरोप याआधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी केला होता. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेसुद्धा याच पद्धतीची री ओढताना दिसून येतात. मात्र खूप चुकीचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 


पंडित नेहरूंनी वापरलेल्या क्लुप्तीमुळेच गोवा मुक्त झाल्याचेच सांगत अमेरिकेच्या अधिपत्याखाली पाश्चात्य राष्ट्रांच्या गटाचा सामना करीत अहिंसक आणि शांततापूर्ण मार्गाने पंडित नेहरूंनी हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर हाताळला होता. आणि यामुळे पोर्तुगालची मक्तेदारी संपवत गोवा मुक्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 


या पत्राबरोबर दक्षिणायनने गोवा मुक्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गोवा सरकारने प्रकाशित केलेल्या डॉ निष्ठा देसाई यांच्या लिबरेशन आर्म्ड स्ट्रगल या पुस्तकाची प्रतसुद्धा पाठविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT