Goa Dairy milk Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy milk: आजपासून नवे दर; गोवा डेअरीचे दूध चार रुपयांनी महागले

गोवा डेअरीचे दूध खरेदी करावे लागणार असून लिटरमागे चार रुपयांची वाढ केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Dairy milk: गोवा डेअरीच्या दूध दरात अचानक मोठी वाढ केल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. आधीच महागाईने पोळलेल्या ग्राहकांना आता वाढीव दराने गोवा डेअरीचे दूध खरेदी करावे लागणार असून लिटरमागे चार रुपयांची वाढ केली आहे.

शनिवार, 21 जानेवारीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ महिन्यांत गोवा डेअरीने ही दुसऱ्यांदा दरवाढ केली आहे.

राज्यातील ग्राहकांचा विश्‍वास संपादन केलेल्या गोवा डेअरीने दूध दरात वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचे टॉनिक असलेले दूध महागड्या दराने खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे आधीच महागाईने होरपळलेल्या ग्राहकांच्या ग्राहकाच्या खिशाला कात्री लागणार आहे.

यापूर्वी एक मे2022 रोजी गोवा डेअरीने दूध दरवाढ केली होती. आता आठ महिन्यांच्या काळात पुन्हा एकदा दरवाढ केली असून सरासरी किमान सहा ते आठ रुपये विविध प्रकारच्या दूध पाकिटांवर वाढवल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुपचूप दरवाढीचे गौडबंगाल काय?

गोवा डेअरीच्या दूध दरात गुपचूप दरवाढ केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी दरवाढ करण्यापूर्वी अगोदर तसे जाहीर केले जायचे. पण आज झालेली दरवाढ ही गुपचूप असून काही दूध वितरकांना वाढीव दूध दराचे पत्रक वितरित केले तर अन्य काही दूध वितरक या दरवाढीबद्दल अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

हायफॅट दूध दर पाच रुपयांनी वाढला

विशेष म्हणजे, गोवा डेअरीचे स्टॅण्डर्डाईज्ड दुधाच्या अर्ध्या लिटरच्या पाकिटाला 27 रुपये द्यावे लागायचे. तेथे आता 29 रुपये द्यावे लागणार आहेत, तर हायफॅट एक लिटरच्या दुधाला कालपर्यंत 62 रुपये द्यावे लागायचे.

तेथे आता 67 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे विविध तऱ्हेच्या दुधावर साधारण चार ते पाच रुपये प्रतिलिटर दरवाढ झाली आहे.

गोवा डेअरीचा कोसळता डोलारा...

गोवा डेअरीचा कोसळता डोलारा सावरण्यासाठी ही दरवाढ केल्याचे सांगितले जाते. सद्यस्थितीत गोवा डेअरीकडून 57 हजार लिटर दुधाची विक्री होते. त्यापैकी दहा हजार लिटर दूध राज्याबाहेरून आणावे लागते.

गोवा डेअरीतील अवास्तव नोकर भरती, तसेच इतर कथित घोटाळ्यांमुळे मागच्या आमसभा गाजल्या होत्या. त्यातच आता दरवाढ केल्यामुळे दूध उत्पादकांना त्याचा काही फायदा होणार का, असा सवाल करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT