Goa Dairy Dainik Gomantak
गोवा

खूशखबर..! गोवा डेअरीकडून दूध उत्पादकांना गुढी पाडव्याची भेट

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावरच दूध उत्पादकांसाठी गोवा डेअरीकडून खूशखबर..! दूध उत्पादकांना प्रती लिटर २ रुपये दरवाढ

दैनिक गोमन्तक

पणजी : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावरच दूध उत्पादकांसाठी गोवा डेअरीकडून खूशखबर देण्यात आली असून दूध उत्पादकांना प्रती लिटर २ रुपये दरवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय डेअरीच्या त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीने आज गुरुवारी झालेल्या बैठकीत घेतला. तर यावेळी दूध विक्री दरातही किमान २ रुपये दरवाढ करण्याचा ठराव घेण्यात आल्याने मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. (Goa Dairy raises milk producers by Rs 2 per liter)

तर गुरुवारी गोवा (Goa) डेअरीच्या त्रिसदस्यीय समितीची बैठक पार पाडली. ज्यामध्ये दूध (Milk) उत्पादकांना डोळ्यासमोर ठेऊन काही निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये दूध उत्पादकांना दरवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे गोवा डेअरी तर्फे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दूध उत्पादकांना प्रती लिटर २ रुपये दरवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तर याच बैठकीत दूध विक्री दरातही वाढ करण्यात यावी यावर चर्चा झाल्याचे तर त्यावर ठराव घेण्यात आल्याचे कळत आहे. या ठरावाप्रमाणे गोवा (Goa) डेअरीच्या दूध विक्री दरात किमान २ रुपये दरवाढ करण्यात येणार आहे. मात्र दूध उत्पादकांना प्रती लिटर २ रुपये दरवाढ देण्यासह दूध विक्री दरातही किमान २ रुपये दरवाढ करण्याबाबतच्या ठरावावर सहकार निबंधकाची मंजुरी मिळालेली नाही. त्या ठरावांवर मंजुरी मिळवण्यासाठी हे दोन्ही प्रस्ताव पणजी मुख्यालयात सहकार निबंधकांकडे पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान मध्यंतरी गुजरात (Gujarat) मिल्क फेडरेशनने अमूल दुधाच्या दरात वाढ केल्यानंतर गोवा डेअरीनेही दूधदरात मोठी वाढ करण्याच्या तयारीत होती. गोवा (Goa) डेअरीच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष आगोस्टिनो मिस्किटा यांनी दूधदराच्या वाढीचे संकेत दिले होते. त्यावेळी 10 किंवा 11 मार्चरोजी बैठक घेऊन त्यात दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात येईल असं मिस्किटा यांनी स्पष्ट केलं होतं. त्याप्रमाणे दूध विक्री दरातही किमान २ रुपये दरवाढ करण्याचा ठराव घेण्यात आला आहे.

गोवा डेअरीकडून (Goa Dairy) सध्या फुल क्रीम म्हशीचं दूध, शक्ती दूध, गायीचं दूध, आणि टोन्ड दूध अशा चार प्रकारात दुधाची विक्री केली जाते. सध्या फुल क्रीम दुधासाठी 55 रुपये प्रतिलिटर, शक्ती दुधासाठी 50 रुपये, गायीच्या दुधासाठी 46 रुपये आणि टोन्ड दुधासाठी 44 रुपये प्रतिलीटर मोजावे लागतात. गोवा डेअरीकडून दरदिवशी अंदाजे 55 हजार लीटर दुधाची विक्री स्थानिक बाजारात केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT