Goa Dairy milk became expensive Dainik Gomantak
गोवा

सोमवारपासून गोवा डेअरीचे दूध महागणार

टोन्ड दूध दरात प्रती लिटर 4 रुपये तर फूल क्रीम दूध दरात 5 रुपये प्रती लिटर वाढ केली आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा: इंधन दरवाढ आणि महागाईने सामान्य त्रस्त असताना रोजच्या आहारातील गोवा डेअरीचे दूधही सोमवारपासून महागणार आहे. गोवा डेअरीने स्टँडर्डाईज्ड गाय व टोन्ड दूध दरात प्रती लिटर 4 रुपये तर फूल क्रीम दूध दरात 5 रुपये प्रती लिटर वाढ केली आहे. 2 मे पासून हा वाढीव दर आकारण्यात येईल. उत्पादन शुल्कात वाढ झाल्यामुळे सध्या गोवा डेअरीला नुकसान सोसावे लागते. त्यामुळे गेल्या महिन्यातच गोवा डेअरीच्या दूध दरात वाढ करण्याचा ठराव प्रशासकीय समितीने घेतला होता. यासंबंधीचा प्रस्ताव सहकार निबंधकांकडे पाठवण्यात आला होता. सरकारकडे हा प्रस्ताव देण्यात आल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली. गेल्याच आठवड्यात सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी गोवा डेअरीच्या दूध दरात वाढ होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ही दरवाढ कधी होईल, ते स्पष्ट केले नव्हते.

गेल्या 1 जानेवारी 2020 मध्ये गोवा डेअरीच्या दूध दरात वाढ करण्यात आली होती, ती आता तब्बल दोन वर्षांनी होत आहे. मध्यंतरीच्या काळात कोविड महामारीमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते, पण दुधाची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. परंतू दूध संकलन जास्त होत नसल्याने तसेच बाहेरील दुधाचा रतिबही कमी झाल्याने गोवा डेअरीला नुकसान सोसावे लागत होते. सध्याचा दर दूध उत्पादकांना परवडत नसल्याने दूध उत्पादकांनाही दरवाढ करण्यात आली होती. पण ग्राहकांना भूर्दंड पाडण्यात आला नव्हता, तो आता येत्या सोमवारपासून पडणार आहे.

अशी असेल दरवाढ

शक्ती स्टँडर्डाईज्ड अर्धा लिटर दर 25 रुपयांवरून 27 रुपये.

गाईचे दूध अर्धा लिटर दर 23 रुपयांवरून 25 रुपये.

टोन्ड कोल्ड गोल्ड दूध अर्धा लिटर दर 22 रुपयांवरून 24 रुपये.

फूल क्रीम दूध एक लिटर दर 57 रुपयांवरून आता 62 रुपये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT