Goa Dairy Election  Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy Election : गोवा डेअरी निवडणुकीत राजेश फळदेसाईंचं पॅनल विजयी

बारा संचालकांत राजेश फळदेसाई व विठोबा देसाई गट या गटाच्या 9 सदस्यांची निवड

आदित्य जोशी

फोंडा : गोवा डेअरी निवडणुकीत अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्या पॅनलमधील 9 जण विजयी झाले आहेत. बारा संचालकांत राजेश फळदेसाई व विठोबा देसाई गट या गटाचे 9 सदस्यांची निवड झाली आहे.

गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या रविवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत 167 पैकी 166 जणांनी मतदान केले. एकजण आजारी असल्याने मतदान करू शकला नाही. अन्यथा शंभर टक्के मतदान झाले असते.

गोवा डेअरीच्या बारा संचालकांच्या निवडीसाठी एकूण 38 उमेदवारांसाठी हे मतदान झाले. तीन पॅनल या निवडणुकीत उतरले होते. त्यात माधव सहकारी व श्रीकांत नाईक यांचा प्रत्येकी एक, तर राजेश फळदेसाई व विठोबा देसाई यांचा संयुक्त एक पॅनल मिळून तीन पॅनल रिंगणात होते. गोवा डेअरीची गेल्या 2017 मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर आता पाच वर्षांनी ही निवडणूक झाली असून या निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण झाली होती.

गोवा डेअरीचा मागचा कार्यकाळ हा प्रशासकाच्या नियुक्तीवर चालला. त्यामुळे यावेळेला गोवा डेअरीवर आपले प्रतिनिधित्व असावे, या उद्देशाने 43 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. पण पाच जणांचे उमेदवारी अर्ज फेटाळल्याने शेवटी अडतीस उमेदवार निवडणुकीत शिल्लक राहिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT