Dabolim Airport | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: युकेचे पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल

Goa News: अतिथी देवो भव : दाबोळी विमानतळावर पारंपरिक पद्धतीने केले भव्‍य स्वागत

दैनिक गोमन्तक

Goa News: युकेतून पहिले चार्टर विमान 252 पर्यटकांना घेऊन गोव्यात दाखल झाले. रविवारी सकाळी 8.45 वाजता या सर्व अतिथींचे विमानतळावर पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. प्रत्येक पर्यटन हंगामात ‘युके’ मधून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात दाखल होतात. यंदा मात्र ई -व्हिसाच्या समस्येमुळे ही संख्या काहीशी कमी झाली आहे. भारत सरकारच्या ई-व्हिसा समस्येमुळे ब्रिटनच्या अनेक नागरिकांना गोव्याकडे वळता आले नाही.

गोव्यात येण्यासाठी त्यांना काही अडचणी निर्माण होत आहेत. असे असले तरी आज पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल झाले आहे. या पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन, पारंपरिक धुन वाजवत स्वागत करण्यात आले. राज्यात आता पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून सध्यातरी देशी पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता आता पर्यटनाला पुन्हा चांगले दिवस येतील, अशी आशा व्यावसायिक बाळगून आहेत.

ई-व्हिसामुळे अडचणी

  • कोरोना काळात गृह मंत्रालयाने विविध देशांतील ई-व्हिसा निलंबित केले होते. त्यामध्ये संयुक्त राष्ट्रमहासंघाचाही (युके) समावेश होता. तो आहे तसाच असल्याने ‘युके’मधून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात येतात.

  • सध्या पर्यटन हंगाम सुरू झाल्याने या नियमाचा पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्याची व्हिसा प्रणाली अत्यंत किचकट आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे अनेक पर्यटक गोव्यात येणे टाळत आहेत. याबाबत सरकारकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT