Congress  Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: सोने तस्करीत विद्यमान कॅबिनेट मंत्र्याचा हात, प्रकरण दडपण्यासाठी कस्टमवर दबाव; काँग्रेसच्या आरोपामुळे खळबळ

Dabolim Airport: या प्रकरणात कोण सहभागी आहे याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आहे- फर्नाडीस

Ganeshprasad Gogate

Dabolim Airport: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री कस्टम अधिकाऱ्यांनी डोहा कतार येथून विमानतळावर आलेल्या एका व्यक्तीकडून तस्करी करण्यात आलेले पाच किलो सोने जप्त केले आहे.

सदर सोने तस्करीत राज्य सरकारच्या एका कॅबिनेट मंत्र्यांचा हात असून एक महिला अधिकारीही गुंतल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे कॅप्टन विरियाटो फर्नाडीस यांनी केला आहे.

रविवारी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ओरमिल रॉड्रिग्स, मोरेनो रिबेलो, नितीन चोपडेकर उपस्थित होते. दाबोळी विमानतळावरून सोन्याची तस्करी होत असून हे एक मोठे रॅकेट आहे. तसेच यात गोव्याच्या सरकारमधील मंत्री आणि त्याचा स्टाफ या संपूर्ण प्रकरणात सहभागी असल्याचा काँग्रेसने दोन महिन्यांपूर्वी उघड केल्याचे ते म्हणाले.

काल शनिवारी सोने तस्करीची माहिती कस्टम खात्याला मिळाल्यावर त्यांनी छापा टाकल्यावर असून सदर महिला तिच्या कुटुंबीयांसहित गायब असून हे प्रकरण दडपण्यासाठी सीमा शुल्क खात्यावर दबाव आणला असल्याचेही फर्नांडिस यावेळी म्हणाले

विशेष म्हणजे या सोने तस्करी प्रकरणात कोण सहभागी आहे याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना असून ते त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही फर्नाडीस यांनी यावेळी केला.

या प्रकारामुळेच कालच्या घटनेची माहिती पत्रकार आणि मीडिया पर्यंत पोहोचू दिली नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 आणि 2019 साली 'काला धन' संदर्भात मोठी घोषणा केली होती.

आता त्यांच्याच पक्षातील मंत्री सोने तस्करीच्या प्रकरणात गुंतले असून मुख्यमंत्री सावंत त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हे आता आम्हाला पाहायचं आहे असे कॅप्टन विरियाटो फर्नाडीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय सौझांच्या दुर्मिळ कलाकृतीनं रचला जागतिक विक्रम; 1965 मध्ये साकारलेल्या 'हनुमान– द मंकी गॉड' चित्राला 15.60 कोटींची बोली

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

Military Plane Crash: लँडिंग स्ट्रिप नसताना पत्करला इमर्जन्सी लँडिंगचा धोका; भीषण विमान अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

SCROLL FOR NEXT