Dabolim Airport Goa Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport वर फक्त 30 सेकंदांत होणार प्रवाशांचे ‘बॉडी स्कॅनिंग’

विमानतळावर आठ बॉडी स्कॅनर बसवण्याचा प्राधिकरणाचा निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

Dabolim Airport Goa: दाबोळी विमानतळावरून प्रवास करणे आता अधिक सुलभ होणार आहे. या विमानतळावर आता प्रवासाआधी प्रवाशांची तपासणी करण्यासाठी 15 मिनिटांऐवजी केवळ 30 सेकंदांत हे काम होणार आहे.

विमानतळ प्राधिकरणाने या विमानतळावर आठ बॉडी स्कॅनर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकाता, चेन्नई, पुणे विमानतळाच्या बरोबरीने दाबोळी विमानतळावर असे बॉडी स्कॅनर बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने प्राधिकरणाला मंजुरी दिली आहे.

केंद्र सरकारकडून दाबोळी विमानतळाकडे दुर्लक्ष होते, दाबोळी विमानतळ बंद करण्याचा डाव आहे, असे आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बॉडी स्कॅनरमुळे प्रवाशांच्या अंगावर नेमक्या कोणत्या वस्तू आहेत, याची माहिती तत्काळ मिळणार आहे. प्रवाशाने शरीरात एखादी गोष्ट लपवली, तरी ती शोधण्याची क्षमता या स्कॅनरमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT