Investment Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: खोटे 'आधार कार्ड' दाखवून दिली डिजिटल अरेस्टची धमकी! कासावलीतील व्यक्तीला 2 कोटींचा गंडा; संशयिताला अटक

Goa Digital Arrest: ही कारवाई भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२) सह ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-डी अंतर्गत करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा सायबर क्राईम पोलिसांनी तब्बल २.८० कोटी रुपयांच्या डिजिटल फसवणूक प्रकरणात दिवाकर झा (३०) या संशयिताला अटक केली आहे. कासावली येथील एका रहिवाशाची "डिजिटल अटक" या नव्या पद्धतीने फसवणूक करण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयिताला न्यायालयात हजर केले असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२) सह ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-डी अंतर्गत करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संशयिताने व्हॉट्सअ‍ॅपवरून संपर्क साधत अंमलबजावणी संचालनालयाचा अधिकारी असल्याचे भासविले. तक्रारदाराचा आधार कार्ड मनी लाँडरिंग प्रकरणात वापरला गेला असल्याचा खोटा दावा करून त्याला "हाऊस अरेस्ट" करण्याची धमकी देण्यात आली.

अकरा प्रकरणे!

संशयिताच्या बँक खात्यात जमा झालेल्या ५० लाख रुपयांचा मागोवा घेतल्यावर, ते रक्कम त्याच्या साथीदारांच्या अनेक खात्यांमध्ये वळवण्यात आली असल्याचे समोर आले. ही खाती मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, बिहार, मिझोराम, तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात आणि गोवा या नऊ राज्यांतील ११ सायबर फसवणूक प्रकरणांशी संबंधित असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT