Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: कोटीचा गंडा घालणारा पाचवा संशयित जेरबंद! सायबर टोळीचा पर्दाफाश; उत्तरप्रदेशातून घेतले ताब्यात

Fake Officer Scam Busted: एका महिलेला एक कोटी रुपयांना गंडा घातलेल्या टोळीतील पाचवा संशयित राहुल मिश्रा याला सायबर क्राईम पोलिसांनी उत्तरप्रदेशमधून अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: दिल्ली क्राईम ब्रँचचा पोलिस अधिकारी असल्याचे भासवून एका महिलेला एक कोटी रुपयांना गंडा घातलेल्या टोळीतील पाचवा संशयित राहुल मिश्रा याला सायबर क्राईम पोलिसांनी उत्तरप्रदेशमधून अटक केली. त्‍याच्याकडून दोन मोबाईल, एक लॅपटॉप, एक टॅब व दोन हार्ड-डिस्क जप्त करण्यात आल्‍या आहेत.

व्‍हॉट्‌स-ॲप मोबाईलवरून गोव्यातील महिलेला फोन करून दिल्ली क्राईम ब्रँचचा पोलिस निरीक्षक असल्याचे सांगून तिला सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) तक्रारपत्र नोंद झाल्याचे माहिती दिली. तसेच ही तक्रार नको असल्यास एक कोटी रुपये विविध बँक खात्यांमध्‍ये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार तिने ही रक्कम पाठविली.

काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर क्राईम कक्षाकडे तक्रार दाखल केली. सायबर क्राईम पोलिसांनी या प्रकरणाचा अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्‍याने तपास करून चौघांना अटक केली. पाचव्‍या संशयिताला उत्तरप्रदेशमधून जेरबंद करण्‍यात आले. राहुलची चौकशी केली असता त्याने इतर राज्यांमध्‍येही काहींची सायबर घोटाळ्‍यांद्वारे फसवणूक केल्‍याचे उघड केले.

अडीच कोटी लंपास

आत्तापर्यंत राहुलने सात प्रकरणांमधून सुमारे २ कोटी ५८ लाख रुपये दोन बँक खात्यांवरून लंपास केले आहेत. आता त्याचा गोव्यातील (Goa) प्रकरणात असलेल्या गुन्ह्याप्रकरणी तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT