Goa Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime: ईमेल आयडी हॅक करून 40 लाखांची अफरातफर

Goa Cyber Crime: गोव्यात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ

Ganeshprasad Gogate

Goa Cyber Crime: एका अज्ञात व्यक्तीने पणजी येथील मेसर्स मरीन इन्फ्रास्ट्रक्चर गोवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षाचा ईमेल आयडी हॅक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

हॅक केलेला डेटा वापरून संबंधिताने “डेल्टा इन्फ्रालॉजिस्टिक्स (वर्ल्डवाइड) लिमिटेड” नावाने बनावट अकाउंट सुरु केले होते.

तसेच खाणकामाच्या क्रेनच्या बिझनेससाठी म्हणून त्याने बनावट बँक अकाउंट सुरु करून 40 लाखांची अफरातफर केल्याचेही उघड झाले आहे.

त्या अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून सायबर पोलिसांना तपासादरम्यान हॅक झालेला ईमेल आयडी शोधून काढण्यात यश आले आहे.

तसेच बनावट बँक अकाउंटही पोलिसांनी शोधून काढले आहे. या घटनेचा यापुढील तपास सुरू आहे

गोव्यात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार 2020 ते 2022 या काळात गोव्यात एकूण 166 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली.

2020 मध्ये एकूण 40, सन 2021 मध्ये 36 आणि सन 2022 मध्ये 90 गुन्ह्यांची नोंद झाली होती. सन 2020 नंतर राज्यात सायबर गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ ही तब्बल 300 टक्के इतकी आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: तिकीट अन् राजकीय चर्चा..!

US Shopping Mall Shooting: अमेरिकेत शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार; तिघांचा मृत्यू, पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर ठार Watch Video

RGP Goa Internal Differences: 'आरजी'मधील वादामुळे लोकांचा झाला भ्रमनिरास; वीरेश बोरकर गोवा राखण्यासाठी करणार युती?

Goa Politics: युतीच्या चर्चेला मुहूर्त, विजय-गिरीश यांची मडगावात भेट; जागावाटपावर मात्र 'ब्र'ही नाही

Peru Tourist Plane Crash: पेरूमध्ये भीषण दुर्घटना! पर्यटकांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; पायलटसह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT