Goa customs hydroponic ganja seizure Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'मोपा'वर मोठी कारवाई! 8 कोटींचे अमली पदार्थ जप्त; बँकॉक, अबूधाबीतून आलेल्या 5 प्रवाशांना अटक

Goa customs hydroponic ganja seizure: तपासणी केल्यावर हा पदार्थ अमली असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित प्रवाशांना अमली पदार्थ व मनःप्रभावी द्रव्ये कायदा १९८५अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : गोवा सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) हवाई गुप्तचर विभागाने मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करत खाद्यपदार्थांच्या पाकिटांमधून आणलेला सुमारे ८ कोटी रुपये किमतीचा २३ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. ही कारवाई करत बँकॉक आणि अबूधाबी येथून मस्कतमार्गे आलेल्या पाच प्रवाशांना अटक करण्यात आली.

प्रवासी प्रोफायलिंगच्या आधारे संशयित प्रवाशांना अडवून त्यांच्या साहित्याची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्यांच्या चेक-इन बॅगेजमधील खाद्यपदार्थांच्या पॅकेट्समध्ये लपवून ठेवलेला हा गांजा आढळून आला.

एनडीपीएस फिल्ड टेस्टिंग किटद्वारे तपासणी केल्यावर हा पदार्थ अमली असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित प्रवाशांना अमली पदार्थ व मनःप्रभावी द्रव्ये कायदा १९८५अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून ‘नशामुक्त भारत’ उभारण्याच्या निर्धारात सीमा शुल्क विभाग कटिबद्ध असल्याचे सीमा शुल्क आयुक्त सुनील बी. देशमुख यांनी नमूद केले.

पाच अटकेत

हे ड्रग्स तब्बल २३ किलो ८३२ ग्रॅम होते. त्या संशयास्पद पदार्थांची तत्काळ एनडीपीएस फिल्ड टेस्टिंग किटद्वारे तपासणी केल्यावर तो हायड्रोपोनिक गांजा असल्याचे दिसून आले. याची काळ्या बाजारातील किंमत अंदाजे ८ कोटी ३४ लाख १२ हजार रुपये आहे. यापैकी दोन प्रवासी बँकॉकहून मस्कतमार्गे, तर एक प्रवासी अबूधाबीहून मस्कतमार्गे २५ मार्च रोजी मोपा विमानतळावर आला होता. यात अन्य दोन प्रवाशांचाही समावेश आहे.

खुबीने लपविला होता गांजा

सीमा शुल्क आयुक्त सुनील देशमुख यांनी सांगितले, की गुप्तचर यंत्रणेला अमली पदार्थ आणण्यात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पाळत ठेवून प्रवाशांना पकडण्यात आले. सुरुवातीला या प्रवाशांकडे काहीच सापडले नाही. त्यांच्या चेक इन बॅग तपासल्या असता खाद्यपदार्थांची पाकिटे मिळाली. त्या पाकिटांतच खुबीने हायड्रोपोनिक गांजा दडवून ठेवला होता. विशेष म्हणजे, सर्व खाद्यपदार्थ पाकिटाबाहेर काढले, तरी हा गांजा दृष्टीस पडत नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT