Permission to start cinemas in Goa at 50 percent capacity Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची मुभा; 'या' असतील अटी

Goa Curfew: राज्यव्यापी संचारबंदीमध्ये आठवडाभर वाढ करण्याचे सरकारचे सत्र मात्र गेले अडीच महिने सुरूच आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Curfew: कोविड - 19 च्या पार्श्‍वभूमीवर गेल्यावर्षी मार्चमध्ये टाळेबंदी लागू केल्यापासून राज्यात सिनेमागृहे बंद होती. सरकारने आज पुन्हा आठवडाभर राज्यव्यापी संचारबंदीत (Curfew) वाढ करताना सिनेमागृहांना (Theater) 50 टक्के बसण्याच्या क्षमतेने खुली करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे गेले काही महिने आतुरतेने प्रतीक्षेत असलेल्या सिनेमागृहांच्या मालकांना दिलासा मिळाला आहे. तसेच सिनेरसिकांना चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हा कर्फ्यू येत्या 30 ऑगस्टपर्यंत सकाळी 7 वा. पर्यंत वाढवण्यात आला आहे.

राज्यव्यापी संचारबंदीमध्ये आठवडाभर वाढ करण्याचे सरकारचे सत्र मात्र गेले अडीच महिने सुरूच आहे. त्यामुळे हा कर्फ्यू यावेळी तरी सरकार उठविल अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. सिनेमागृहांना त्यातून सूट देताना कसिनो, ऑडिटोरियम, कम्युनिटी हॉल, रिव्हर क्रुझ, वॉटर पार्क, मनोरंजन पार्क, स्पा व मसाज पार्लर, शाळा हे बंद ठेवण्यात आले आहे. व्यायामशाळा तसेच हॉटेल व बार हे 50 टक्के क्षमतेने यापूर्वीच सुरू करण्यास मुभा दिलेली आहे.

सिनेमागृहांसाठी ‘एसओपी’

  1. प्रवेशद्वारावार सॅनिटायझरची सोय

  2. सिनेरसिकाला मास्कची सक्ती

  3. दोन खुर्च्यांमध्ये सुरक्षित अंतर

  4. ‘थर्मलगन’ने प्रत्येकाची तपासणी

  5. सभागृहांचे चित्रपटानंतर सॅनिटायझेशन

50 टक्के प्रेक्षक क्षमतेने थिएटर उघडण्याची परवानगी दिली असली तरी इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काही दिवस लागतील. त्याचबरोबर सुरवातीलाच प्रेक्षक मोठ्या संख्येने येतील की नाही याबाबत साशंकता आहे. मात्र या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे मत अध्यक्ष चित्रपटगृह मालक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण झांट्ये यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT