goa
goa Dainik Gomantak
गोवा

Goa Culture : आपली कृषी संस्कृती राखण्याची गरज : कलाधर मुतवा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Culture :

वाळपई, आमची पारंपरिक कृषी संस्कृती टिकली तरच आमचे जीवन टिकेल. आपल्या गावातील कृषी संस्कृतीचे जतन आम्हीच करायला हवे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिंधी लेखक कलाधर मुतवा यांनी सांगितले.

तार, धावे सत्तरी येथे पारंपरिक पुरण शेतीचा अभ्यास करायला आलेल्या विवेकानंद ज्ञान मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते.

यावेळी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक गोपीनाथ गांवस, शिक्षक रामदास शेटकर, पुरण शेतकरी गणेश पर्येकर, गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमलचे विद्यार्थी शिक्षक स्वीटी गावस, भक्ती सुतार, आर्या भावे आणि वत्सला देसाई उपस्थित होते.

यावेळी प्रकाश पर्येकर व स्वामी विवेकानंद स्मृती संघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव गांवस यांनी पुरण शेतीच्या कष्टाविषयी माहिती यावेळी दिली.

यावेळी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे डॉ. प्रकाश पर्येंकर व कलाधर मुतवा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

पुरण शेती वीस वर्षांनी पुनर्जीवित : पर्येकर

प्रकाश पर्येकर म्हणाले, आमच्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपासून पुरण शेती परंपरा जतन करून ठेवली होती. या पुरण शेतीवरच सत्तरीच्या अनेक गावातील लोक निर्भर होते.

वेगवेगळ्या गावांतील शेकडो पुरण शेती म्हादईच्या काठावर केली जायची. ही शेती पुन्हा वीस वर्षांनी आता पुनर्जीवित केली गेली आहे. याचे जतन आणि संवर्धन करणे आमची जबाबदारी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT