Goa Culture  Dainik Gomantak
गोवा

Goa Culture: ''दे धेंडलो, धेंडल्यान पावस शेणलो'' सावईवेरेत धेंडलोत्सव उत्साहात

Goa Culture: गावातील वाड्या-वाड्यांवर धेंडलो उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

Goa Culture: ''दे धेंडलो, धेंडल्यान पावस शेणलो '' अशी पारंपरिक लोकगीते गाऊन ढोल - ताशांच्या निनादात सावईवेरे गावातील वाड्या - वाड्यांवर काल धेंडलो उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विविधरंगी कागदांनी व सुवासिक फुलांनी लाकडी घुमटी सुशोभित करून घुमटीत श्रीकृष्णाची छोटी मूर्ती अधिष्ठित करण्यात आली.

पूर्वापार पद्धतीने पूजा - अर्चा करून धेंडलो डोक्यावर घेऊन वाद्यांच्या तालात धेंडलो नाचवत व पारंपरिक लोकगीते म्हणत गावातील वाड्या - वाड्यावरील घरोघरी धेंडल्याची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ज्येष्ठ मंडळीसह बराच युवक तसेच बाल वर्गाचाही समावेश होता.

प्रत्येकाच्या घरी सुहासिनीकडून धेंडल्याचे आनंदाने स्वागत करून त्यास गंध फुले वाहून दक्षिणा देताना दिसत होत्या. धेंडल्याच्या पारंपारिक गायीला जाणाऱ्या गीतांनी आणि वाद्यांच्या निनादामुळे सावईवेरे गावातील वातावरण मंगलमय झाले होते.

पाडव्यानिमित्त या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या गुरांचीही पूजाही केली. आजच्या दिवशी तुळशीवृंदावनाजवळ शेणाचा गोठा बनवून गोठ्याची विधिवत पूजाही करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

SCROLL FOR NEXT