Goa Crime:  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: साखळीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले; कारमधून आले अन् 6 लाखाचा ऐवज घेऊन गेले...

चोरटे सीसीटीव्हीत कैद; वामनेश्वर रेसिडेन्सी इमारतीतील घटना

Akshay Nirmale

Goa Crime: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या साखळीमध्ये सोमवारी भरदिवसा चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडले. विशेष म्हणजे, कारमधून हे चोरटे आले आणि आरामात चोरी करून कारमधून निघून गेले.

साखळीतील डिचोली अर्बन सहकारी बँकेच्या समोर वामनेश्वर रेसिडेंसी या इमारतीत ही धाडसी चोरी झाली आहे.

शहरात भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे डिचोली पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. दरम्यान, तिन्ही चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. ते कारमधून निघून जातानाही सीसीटीव्हीत दिसते.

सोमवारी सकाळी वामनेश्वर रेसिडेंसी या इमारतीत या चोरट्यांनी ४० मिनिटांत पहिल्या मजल्यावरी एक आणि दुसऱ्या मजल्यावर एक असे दोन फ्लॅट फोडले. दोन्ही फ्लॅटमधून सुमारे 6 लाखांचा ऐवज त्यांनी पळविला असून त्यात सुवर्णलंकार आणि रोख रक्कमेचा समावेश आहे.

या चोरट्यांनी डिचोील अर्बन सहकारी बँकेच्या समोरच सकाळी ११.३० च्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची कार पार्क केली होती. त्यातून आधी दोघेजण खाली उतरले व ते जणू काही या इमारतीत येत जात असतात याच अविर्भावात थेट बिनधास्त इमारतीत गेले.

त्यानंतर अन्य एक व्यक्ती खाली उतरला. चाळीस मिनिटांत दोन फ्लॅटमध्ये चोरी करून तिघेही कारमध्ये बसून पसार झाले. ही गाडी डिचोलीच्या दिशेने गेली. पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT