Goa Crime
Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सिद्धी नाईकच्या हरवलेल्या कपड्यातच लपलंय तिच्या मृत्यूचे गुढ...

Santosh Govekar

बुधवारपासून बेपत्ता असलेल्या नास्नोळा हळदोणा (Nansola - Aldona) येथील सिद्धी नाईक (19) या तरुणीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह (Half-naked corpse) गुरुवारी सकाळी कळंगुट पोलिसांना (Calangute Police) किनाऱ्यावर आढळून आला आणी त्याच दिवशी दुपारपर्यंत बांबोळीच्या फॉरेन्सिक विभागाकडून (Department of Forensics) सादर करण्यात आलेला शवचिकित्सा अहवाल हाती मिळताच बिल्कुल वेळ न दवडता गुरुवारी संध्याकाळी तरुणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शवचिकित्सा अहवालानुसार त्या तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून तिच्यावर कुठल्याही प्रकारची बळजबरी झाल्याचे स्पष्ट होत नव्हते. दरम्यान, गुरूवारी सकाळी पर्वरीत कामावर जाण्यासाठी निघालेल्या सिद्धी नाईकने टाईट फीट जीन्स तसेच टिशर्ट परिधान केला होता, मात्र, कळंगुटच्या किनाऱ्यावर (Calangute Beach) स्थानिक पोलिसांना तिच्या अंगावरचे अंतरवस्त्र (Inner wear) सोडल्यास अन्य एकही कपडा नव्हता त्यामुळे आतापर्यंत बुडून मरण पावलेले आणी नंतर आठ आठ दिवसांनी हाती लागलेले  म्रुतदेह (Dead body) आणी सिद्धीच्या म्रूतदेहात मोठा फरक दिसून येत होता. त्यामुळे टाईट जीन्स आणी टीशर्ट असा पोशाख करून शरीर पुर्णपणे झाकून घरुन निघालेल्या व नंतर अर्धनग्न अवस्थेत कळंगुटच्या किनाऱ्यावर सापडलेल्या सिद्धीच्या मृतदेहावरुन अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (Goa Crime)

दरम्यान, दहावीपर्यतचे शिक्षण घेतलेली तसेच चारचौघांत उठून दिसणारी सिद्धी नाईक एखाद्या लबाडाच्या नादाला इतक्या सहजासहजी लागणे तसे शक्य नव्हते त्यामुळे बुधवारी सकाळी म्हापसा नजीकच्या हॉटेल ग्रीनपार्क परिसरातून सिद्धीला उचलणारा अथवा लीफ्ट देणारा व्यक्ती तिच्याच जवळच्या संम्पर्कातील नसावा कशावरून असा सवाल याभागातील स्थानिक लोकांकडून विचारला जात आहे. दुसऱ्या बाजूने कामावर जातांना नियमीतपणे मोबाईल संच स्वताजवळ ठेवणार्या सिद्धीने त्याचदिवशी मोबाईल घरी ठेवण्यामागचे नेमके कारण काय ? तसा कुणी तिच्यावर दबाव आणला होता काय अथवा ती वापरत असलेल्या मोबाईलवरून तिला धमकीवजा फोन कॉल्स येत होते काय असाही प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, शवागारातून मिळालेल्या अहवालाची चिकीत्सा न करतां अथवा दुसऱ्या अहवालाची मागणी न करतां तिच्यावर संध्याकाळपर्यंत अंत्यसंस्कार करण्याची घाई करणे गरजेचे होते काय? असाही प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे. दरम्यान, म्हापसा ते पर्वरी आणी कळंगुट किनाऱ्या पर्यतच्या मुख्य रस्त्यावरील अथवा खाजगी आस्थांपनातील सीसीटीव्ही केमर्यांचा या प्रकरणात उपयोग करण्याची बार्देश पोलिसांनी तसदी घेतल्यास या गुढ मृत्युचे रहस्य उघड होण्याची शक्यता बार्देशातील जाणकार लोकांकडून व्यक्त केली जात आहे. . . . .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT