Goa Crime: Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: विश्वासू नोकरानेच मालकाला घातला गंडा; तब्बल 23 लाख रुपये लुबाडले, पर्वरीत खासगी फर्ममधील प्रकार

संशयित मूळचा ओडिशाचा, गुन्हा दाखल

Akshay Nirmale

Goa Crime: पर्वरी येथील एका खासगी फर्ममध्ये अकाऊंट असिस्टंट म्हणून कार्यरत असलेल्या एकाने मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याला चक्क २३ लाख रूपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

ग्रीन हिल्स, सुकूर येथील क्रिएटिव्ह आंत्रप्रेन्युअरचे मालक हुकुमपाल देवेंद्र सोलंकी (वय ३७) यांनी पर्वरी पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली आहे.

त्यात म्हटले आहे की, आरोपी सुसंता कुमार बाबाजी गोछायत (वय ४३, रा. ओडिशा) हा त्यांच्याकडे अकाउंट असिस्टंट म्हणून काम करत होता आणि त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. स्थानिक गरजांसाठी पैसे वितरित करण्याचे काम त्याला दिले होते.

पण विश्वास असल्याचा गैरफायदा घेत गोछायत याने 23 लाख रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. त्याने विश्वासघात केला आहे.

आरोपी गोछायत हा काही दिवसांपूर्वीच ओडिशामध्ये त्याच्या मूळ गावी गेला होता आणि तो परत न आल्याने आणि त्याने फोन कॉलला प्रतिसाद देत नसल्यामुळे, सोळंकी यांना काहीतरी चुकीचे घडले असल्याचा संशय आला.

त्यांनी तपासणी केल्यावर त्यांना ही फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ४०८ अन्वये गुन्ह्याची नोंद केली असून पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सीताराम मलिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT