Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Suicide Case: हडफडे येथे 26 वर्षीय परप्रांतीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

पतबित्र दास याचा मृतदेह सिलिंग रॉडला साडीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Suicide Case: हडफडे -बार्देश गोवा येथे एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या पतबित्र दास (वय 26, मूळ रहिवासी पश्‍चिम बंगाल) नामक मुलाने राहत्या भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

सदर मुलगा जेजास दे कोस्‍टा यांच्या मालकीच्या घरात (घर नं 136, हडफडे, बार्देश) भाड्याने राहत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. पतबित्र दास याचा मृतदेह सिलिंग रॉडला साडीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

त्याच्या सोबत त्याचे कुटुंबीय तेथे वास्तव्याला आहेत का? त्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? सदरची घटना म्हणजे आत्महत्या कि घातपात? या बाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आली नाही.

दरम्यान म्हापसा अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून प्राथमिक तपासानंतर मृतदेह हणजुण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास देखील हणजूण पोलीस करणार आहेत

सविस्तर बातमी अपडेट करीत आहोत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT