Gas cylinder Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : राज्यात सिलिंडरमधून गॅस चोरणारे सक्रिय

Goa Crime : वेर्णा येथेही सापडले कमी वजनाचे सिलिंडर

दैनिक गोमन्तक

मडगाव : राज्यात घरगुती सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून त्याची विक्री होत असल्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. वजन व मापे खात्याच्या अधिकाऱ्यांनी वेर्णा येथे एका निर्जन जागेत ठेवलेली सिलिंडर पुरविणारी गाडी आज पकडली. त्यावेळी तिथे कमी वजनाचे 15 सिलिंडर सापडले.

वजन व मापे खात्याच्या पथकाला वेर्णा येथे टोयोटा शोरुमजवळ एक गॅस सिलिंडरची गाडी दिसली. अधिकाऱ्यांनी या वाहनाचा पाठलाग केला असता ती एका आडवाटेने जाऊन थांबली. निर्जन परिसरात असलेल्या एका इमारतीसमोर पार्क करून चालकाने तेथून पळ काढला. परिसराची पाहणी केल्यावर अधिकाऱ्यांना तिथे झाडीत अनेक व्यावसायिक वापराचे लपवलेले रिकामे सिलिंडर लपवून आढळले.

तसेच सिलिंडरची अनेक सिल्स सापडली. सिलिंडरमधील गॅस काढून तो दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरण्यासाठीच ती तिथे आणली असावी, असा संशय आहे. ज्या इमारतीसमोर ही गाडी उभी केली होती, तिथे एका गॅस एजन्सीशी संबंधित व्यक्ती भाड्याने राहात आहे, अशी माहिती असून यासंदर्भात चौकशी सुरू आहे. जप्त केलेले सिलिंडर हे आगशी येथील कनिष्क एजन्सीचे असल्याचे सांगण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT