Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Crime News: वारंवार पैसे मागते, म्हणून पतीने पत्नीला संपविले! साळगावातील धक्कादायक घटनेने राज्य हादरले

Goa Crime: त्नी वारंवार पैसे मागते, म्हणून संतापलेल्या पतीने सुरीने निर्घृणपणे तिचा गळा कापून खून केल्याचा धक्कादायक प्रकार मुड्डोवाडो-साळगाव येथे घडला.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: पत्नी वारंवार पैसे मागते, म्हणून संतापलेल्या पतीने सुरीने निर्घृणपणे तिचा गळा कापून खून केल्याचा धक्कादायक प्रकार मुड्डोवाडो-साळगाव येथे आज घडला. मृत महिलेचे नाव रुक्मिणी राठोड (वय ३६ वर्षे) असे असून, विनोद भालचंद्र राठोड (वय ४० वर्षे) असे पतीचे नाव आहे. ही घटना मुड्डोवाडो-साळगाव येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मूळ गदग (कर्नाटक) येथील कुटुंबात घडली.

ही घटना मुड्डोवाडो-साळगाव येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मूळ गदग (कर्नाटक) येथील कुटुंबात घडली. पत्नी रुक्मिणी हिच्या गळ्यावर सुरीचा वार करून आणि गळा आवळून खून केल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी पती विनोद याला अटक केली आहे. ही घटना (शुक्रवारी) दुपारी १.४५ च्या सुमारास उघडकीस आली. प्रत्यक्ष खुनाची घटना सकाळी ११.३० च्या सुमारास घडली होती. खून केल्यानंतर संशयित विनोद हा आपल्या १२ वर्षीय मुलासोबत साळगाव पोलिस ठाण्यात आला आणि त्याने आपण पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

रुक्मिणी ही विनोदकडे वारंवार पैशांची मागणी करत होती. त्यामुळे तिच्या या प्रकाराला कंटाळून विनोदने रागाच्या भरात तिच्या गळ्यावर सुरीने वार केला. नंतर जखमी अवस्थेतच तिचा गळा आवळला आणि तिला ठार केले. या घटनेची माहिती मिळताच साळगावचे पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयिताने पत्नीच्या मृतदेहावर चादर घातली होती. नंतर पोलिस अधीक्षक विश्वेश कर्पे आणि हरिश्चंद्र मडकईकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

खोली सोडण्यासाठी मालकाचा तगादा

विनोद हा सात-आठ महिन्यांपूर्वी गावी गेला होता. आठच दिवसांपूर्वी तो खोलीवर आला होता. तेव्हापासून रुक्मिणी त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती. त्यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. नेहमीच्या भांडणामुळे घरमालकाने त्यांना खोली सोडण्यास सांगितले होते. येत्या एक तारखेपासून ते दुसरीकडे राहायला जाणार होते. तत्पूर्वीच संशयिताने रागातून पत्नीचा खून केला.

थंड डोक्याने केले कृत्य

राठोड कुटुंबीयांच्या शेजारी दोन खोल्यांमध्ये भाडेकरू राहतात. मात्र, त्यांना कोणतीही चाहूल लागू न देता संशयिताने थंड डोक्याने हे कृत्य केले. नंतर गंभीर जखमी अवस्थेतील पत्नीला खोलीतच टाकून विनोद मुलांना आणण्यासाठी शाळेत गेला. प्रथम त्याने आपल्या दोन्ही मुलींना आणून मेहुणीच्या घरी नेऊन सोडले. नंतर तो लहान मुलाला शाळेतून घेऊन थेट पोलिस ठाण्यात पोचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT