Road Rage Knife Attack Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'रोड रेज'च्या वादातून सुरीने वार; तरुण गंभीर, नास्नोळा येथील घटना; संशयिताला अटक

Road Rage Knife Attack Goa: हळदोणे मतदारसंघातील नास्नोळा येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ‘रोड रेज’च्या वादातून एका युवकावर सुरीने हल्ला करण्यात आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: हळदोणे मतदारसंघातील नास्नोळा येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ‘रोड रेज’च्या वादातून एका युवकावर सुरीने हल्ला करण्यात आला. यात थिवी येथील रहिवासी असलेला मंथन आगरवाडेकर (वय २५) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी कारवाई करत संशयित सूरज कसबे (वय २८, रा. मयडे, मूळ : महाराष्ट्र) याला काही तासांतच अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मंथन आणि संशयित सूरज यांच्यात रस्त्यावर वाहन चालवण्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे गंभीर हाणामारीत झाले आणि संशयित सूरजने मंथनच्या पाठीत सुरी भोसकली.

घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या मंथनला सुरुवातीला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेबाबत पीडिताचा भाऊ मयूर आगरवाडेकर यांनी म्हापसा पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujarat ATS Drug Seizure: अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्स जप्त! इराणच्या जहाजातून 526 किलो अमलीपदार्थ, पाकिस्तानचे 5 तस्कर ताब्यात

Rohit Sharma Celebration: 35वं वनडे शतक अन् रोहित शर्माचा हटके अंदाज! खास सेलिब्रेशनचा अर्थ विचारताच हिटमॅन म्हणाला, 'हे माझ्यासाठी...' VIDEO

Birch By Romeo Lane Fire: 25 मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाख! ‘बर्च’ अग्निकांडात लुथरा बंधूंचा उच्च न्यायालयात भरपाईचा मोठा प्रस्ताव

Goa SIR Voter Deletion: 'सॉफ्टवेअरची चूक, शिक्षा मतदारांना का?'; निवडणूक आयोगाची गोवा खंडपीठाकडून झाडाझडती

Horoscope: पैसा, नोकरी आणि यश! गुरुवार 'या' राशींच्या व्यक्तींसाठी ठरणार खास, मिळू शकतो आर्थिक लाभ अन् प्रगतीचा योग

SCROLL FOR NEXT