Goa Crime Police unable to unravel mystery after nine days Dainik Gomantak
गोवा

तपासकार्यातील अपयश लपवण्यासाठी नैसर्गिक मृत्‍यूचा कांगावा?

ग्रामस्‍थांकडून नाराजी; नऊ दिवसांनंतर पोलिस गूढ उकलण्‍यास असमर्थ

दैनिक गोमन्तक

सांगे: वरकटो - सांगे येथील भारती सामंत यांच्या मृत्यूला नऊ दिवस पूर्ण झाले. तरीही पोलिस (Goa Crime) गूढ उकलू शकले नाहीत. तपास पुढे जात नसल्याने त्‍यांना चक्कर येऊन किंवा घसरल्‍यामुळे नैसर्गिक मृत्‍यू झाला, असा तर्क पोलिसांकडून काढला जात आहे.

पडल्यानंतर त्‍यांच्‍या डोक्याला आणि मानेला जखमा झाल्या, असा तार्किक निष्कर्ष काढून तपासाला गती दिली जात नसल्‍याने आता हे प्रकरण थांबणार तर नाही ना? असा संशय ग्रामस्‍थांना येऊ लागला आहे.

गेल्या रविवारी भारती सामंत यांच्‍या राहत्या घरात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. शवचिकित्‍सा अहवालात डोके, मान आणि शरीरावर जखमा झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळेच डॉ. मधू घोडकिरेकर यांच्‍यासोबत अन्य एक डॉक्टर आणि उपअधीक्षक घटनास्थळी भेट देऊन किमान तासभर सर्व माहिती गोळा करून गेले होते. पण, पोलिस तपासात नऊ दिवसांत काहीच धागेदोरे, पुरावे हाती लागलेले नाहीत. त्‍यामुळे ग्रामस्‍थांनी व सामंत कुटुंबियांनी नाराजी व्‍यक्त केली आहे.

अनुत्तरीत प्रश्‍‍न

पोलिसांच्या म्हणण्यानुसार भारती सामंत यांचा मृत्यू पडून झाला, तर मग त्‍यांच्‍या गच्चीवरील दरवाजा उघडा कसा राहिला. तसेच आठवड्याभरात जमा होणारी पन्नास ते साठ हजारांची रक्कम कुठे गेली? दोनवेळा त्‍यांच्‍या घरात चोरीचा प्रयत्‍न झाला. मग, तिसऱ्या वेळी केवळ पैशांसाठी चोरटा घरात शिरला नाही कशावरून? जर भारती यांचा मृत्यू पडून झाला, तर या दोन प्रश्नांची समाधानकारक उत्तरे कोण देणार? सोन्याची साखळी असलेली डबी मृतदेहाजवळ कशी पडली? असे प्रश्‍‍न शंका निर्माण करत आहेत.

...तर चोरट्यांना अभय?

भारती सामंत यांचे भाऊ व त्‍यांचे कुटुंबीय त्‍यांचा मृत्यू नैसर्गिक नसून खूनच म्हणून या घटनेकडे पाहत आहेत. जर हा खून असेल आणि पोलिस जर ही घटना पडून त्‍यांचा मृत्यू झाला, असे म्हणून तपास थांबवत असतील, तर चोरट्यांना अभय दिल्यासारखे होईल. गुन्‍ह्यांना एकप्रकारे प्रोत्साहन दिल्यासारखे होऊ शकते. त्यातून उद्या अजून एकट्या दुकट्या राहणाऱ्यांना अशा प्रसंगांना तोंड देण्याची वेळ येऊ नये, अशा प्रतिक्रिया ग्रामस्‍थांकडून व्‍यक्त होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT