Congress MLA Reginald (Goa Crime) Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: तरुणीची मरणानंतर होत असलेली बदनामी पोलिसांनी थांबवावी; आमदार रेजिनाल्ड

तरुणीचे अर्धनग्न देहाचे फोटो कुणी वायरल केले, याचा तपास होणे गरजेचे (Goa Crime)

विठ्ठल पारवाडकर

Panjim: तरुणीची मरणानंतर सुरु असलेली बदनामी (Defamation of Dead Girl) पोलिसांनी बंद करावी. सोशल मिडियावर (Social Media) योग्य नियंत्रण ठेवतानाच पोलिस अधिक्षकांनी या प्रकरणी तपासासाठी पुढाकार घ्यावा. येत्या दोन दिवसात योग्य तपास न झाल्यास काहीही होऊ शकते. असा इशारा कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजीनाल्ड (Congress MLA Reginald) यांनी दिला आहे. आझाद मैदान पणजी येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत (PC at Azad Maidan, Panjim) बोलताना आमदार रेजीनाल्ड यांनी तरुणीच्या मरणानंतर तिची मानसीक स्थिती चांगली नव्हती. असे पोलिसांनी जाहिर करणे योग्य नसल्याचे सांगून तिच्या अर्धनग्न देहाचे फोटो (Photos of half-naked body) कुणी वायरल केले? त्याचा शोध घेण्याची मागणी आमदार रेजिनाल्ड यांनी केली. (Goa Crime)

पोलिसांनी तिच्या पालकावर दबाव आणू नये. अशी मागणी करुन तिचा मृत्यू खरोखरच बुडून झाला की अन्य काही कारणाने ? तिचे कपडे कुठे आहेत ? आठ दिवस झाले तरी अद्याप तपासातून काहीच निष्पन्न कसे झाले नाही? बाणावली बलात्कार प्रकरणी जसा पोलिसांनी गुप्तपणे तपास केला तसा तपास सदर तरुणीच्या बाबतीत का होताना दिसत नाहीये? असे अनेक प्रश्‍न यावेळी रेजीनाल्ड यांनी उपस्थित केले. व येत्या दोन दिवसात पोलिसांनी या प्रकरणी सत्य शोधून तरुणीला न्याय दिला नाही तर काहीही होऊ शकते आणि जे काय होईल त्याला सरकार जबाबदार असेल. असा इशारा यावेळी रेजीनाल्ड यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT